Bigg Boss Marathi 3 : 'इच्छा माझी पुरी करा'च्या टास्कनंतर आज घरात रंगणार 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' चा टास्क
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातील आजी स्पर्धकांना या आठवड्यात वेगवेगळे टास्क देताना दिसून येणार आहे.
![Bigg Boss Marathi 3 : 'इच्छा माझी पुरी करा'च्या टास्कनंतर आज घरात रंगणार 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' चा टास्क Bigg Boss Marathi 3: After the task of 'Ichcha Majhi Puri Kara', the task of 'Chal Re Bhopalya Tunuk Tunuk' will be painted in the house today. Bigg Boss Marathi 3 : 'इच्छा माझी पुरी करा'च्या टास्कनंतर आज घरात रंगणार 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' चा टास्क](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/0bb382055172f551dc6b4cc826c847e0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi 3 Task : बिग बॉसच्या घरातून सुरेखा कुडची बाहेर पडल्यानंतर घरात एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. हा सदस्य म्हणजे सर्वांच्याच आवडीची 'आजी'. आजीने काल घरात जादूचा दिवा ठेऊन जादू खरी करुन दाखवली. त्यामुळे सदस्यांना एका सदस्याला वाचविण्याची सुर्वणसंधी मिळाली होती. घरात काल 'इच्छा माझी पुरी करा' हा नॉमिनेशनचा टास्क पार पडला. घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून या आठवड्यात संतोष चौधरी (दादूस), विकास पाटील, आदिश वैद्य, मीनल शाह नॉमिनेट झाले आहेत.
आज बिग बॉसच्या घरात 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हा कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. प्रोमोमध्ये घरातील सदस्य घरामध्ये लपवलेले भोपळे शोधण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. जो सदस्य सर्व फेऱ्यांमध्ये भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरेल तो सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार असणार आहे.
काल बिग बॉसच्या घरामध्ये पार पडलेल्या 'इच्छा माझी पुरी करा' या नॉमिनेशन टास्कमध्ये अनेक सदस्यांची मने दुखावली गेली आहेत. घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून या आठवड्यात संतोष चौधरी (दादूस), विकास पाटील, आदिश वैद्य, मीनल शाह नॉमिनेट झाले आहेत. आदिशला संधी मिळाली तेव्हा त्याने आविष्कार दारव्हेकरला वाचवले. मीनलला संधी मिळाली तेव्हा तिने सोनाली पाटील आणि विशाल निकमला वाचवले. विशाल मीनलला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून वाचवू शकला नाही. त्याची खंत आज तो मीनलसमोर व्यक्त करताना दिसणार आहे. जयने उत्कर्ष आणि मीनलला सेफ केले होते. तर उत्कर्षने मीरा आणि जयला सेफ केले. तर दादूसने स्नेहा वाघला.
आजच्या भागात सोनाली आणि तृप्ती ताईमध्ये वाद होणार आहे. भात कोणी वाफवावा या शुल्लक कारणाने त्यांच्यात वाद होणार आहे. सोनाली तिचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, तिचे मत ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावर तृप्ती ताई म्हणत आहेत, छोटी गोष्ट आहे. वाढवण्यात काहीच अर्थ नाही. त्यावर सोनाली म्हणते, माझं काम नाही तर मी का करायचं. तृप्ती देसाई कॅप्टन असल्याने त्या दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, सोनालीला कसला तरी राग आल्याने तिचा पारा भलताच चढला आहे आणि ती कुणाचंचं ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळेच त्या दोघींच्या वादाची मजा प्रेक्षकांना घेता येणार आहे.
कॅप्टनसी टास्कमध्ये नेहमीच सदस्यांत भांडणे होत आली आहेत. त्या भांडणांमुळे टास्कदेखील रद्द झाला आहे. त्यामुळे आज रंगणारा टास्कदेखील स्पर्धक नीट खेळतील का आणि घराला नवा कॅप्टन मिळेल का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)