Sai Tamhankar : 'पिंक नाकाची सुंदरी'; सई ताम्हणकरची पोस्ट चर्चेत
नुकतीच सईनं (Sai Tamhankar) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) मराठी चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. सई तिच्या अभिनयानं नेहमीच तिच्या प्रेक्षकांची मनं जिंकते. लवकरच सईची पेट पुराण (Pet Puran) ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सीरिजमध्ये सईबरोबरच अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत नुकतीच सईनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
एक श्वान आणि एक मांजर पाळणाऱ्या जोडप्यावर पेट पुराण या सीरिजचे कथानक आधारित आहे. नुकताच सईनं एका मांजरीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं, 'माझी पिंक नाकाची सुंदरी ! बकूळा म्हणजेच बकू !!' असं कॅप्शन दिलं आहे. सईनं शेअर केलेल्या या पोस्टाला राधिका आपटे आणि सारंग साठे यांनी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
पेट पुराण या सीरिजचे दिग्दर्शन आणि लेखन ज्ञानेश जोटिंग यांनी केली आहे. ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोची निर्माती केली आहे. सहा मे रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोनी लिव या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकणार आहेत.
हेही वाचा :