Rinku Rajguru : रिंकूचा नवा चित्रपट; आठवा रंग प्रेमाचा 'या' दिवशी होणार प्रदर्शित
रिंकूनं (Rinku Rajguru) या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली.
Rinku Rajguru : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात. तिचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रिंकूनं या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली.
रिंकूनं 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टला तिनं कॅप्शन दिलं, 'तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू...'कृतिका'च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू. टीजर येत आहे सोमवारी, चुकवू नका!' या चित्रपटामध्ये रिंकू कृतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती राकेश राऊत आणि समीर कर्णिक, आशिष भालेराव यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केले आहे. 17 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट
View this post on Instagram
सैराट चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये रिंकूनं आर्ची ही भूमिका साकारली. चित्रपटामधील रिंकू आणि आकाशच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकूच्या मेकअप आणि कागर या मराठी चित्रपटांना तर 100, अनपॉज्ड,200 हल्ला हो या हिंदी वेबसीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकू तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 19 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
- Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!