(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pushpa 2 : 'पुष्पा 2' चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा, या दिवशी चित्रपटगृहात होणार दाखल
Pushpa 2 Release Date : 'पुष्पा : द रुल' चित्रपट 100 दिवसांनंतर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.
Pushpa 2 The Rule Release Date : स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जूनचे चाहते त्याच्या आगामी पुष्पा 2 चित्रपटाटची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. पुष्पा द रुल चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुष्पा द रुल चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह रिलीज डेट ठरली
'पुष्पा : द रूल' (Pushpa 2 The Rule) चित्रपटासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन आणि नेत्रदीपक पोस्टरचे रिलीज केलं आहे. जसं काउंटडाऊन सुरू झालं आहे, तशी ‘पुष्पा : द रुल’साठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
या दिवशी चित्रपटगृहात होणार दाखल
पोस्टरमध्ये आपण अल्लू अर्जुनला त्याच्या 'पुष्पराज'च्या अवतारात दिसत आहे. 'पुष्पा 2' च्या नवीन पोस्टरसह टॅगलाइन आहे, 'त्याचा रुल 100 दिवसांत पहा'. पुष्पा 2 चित्रपट आजपासून 100 दिवसांनी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. पुष्पा 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. यासोबतच चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक थरारक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी टीम सज्ज झाली आहे.
पुष्पा : द रुलसाठी काऊंटडाऊन सुरु
View this post on Instagram
पुष्पा 2 मध्येही मुख्य भूमिकेत, अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजची भूमिका पुन्हा एकदा पडद्यावर अधिराज्य गाजवणार आहे. यामुळे चाहते फारच उत्सुक आहेत. सुकुमार दिग्दर्शित आणि फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
2021 मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातील गाणीही फार ट्रेंडमध्ये होती. आता पुष्पा 2 चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा द रुल चित्रपटाच्या गाण्यांनी आधीच प्रेक्षकांने वेड लावलं आहे, आता प्रेक्षक पुष्पाराज पाहण्यासाठी आसुरले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :