Priyanka Chopra : मुलीचं पालनपोषण कसं करणार? पाहा काय म्हणाली प्रियंका चोप्रा...
Priyanka Chopra : या वर्षी जानेवारीमध्ये, प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या घरी एका लहान परीचा जन्म झाला. सरोगसीच्या मदतीने अभिनेत्री आई झाली.

Priyanka Chopra : या वर्षी जानेवारीमध्ये, प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनासच्या (Nick Jonas) घरी एका लहान परीचा जन्म झाला. सरोगसीच्या मदतीने ही अभिनेत्री आई झाली आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. पण यादरम्यान, 'देसी गर्ल' बाळासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांची झलक तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, नुकतीच अभिनेत्री पहिल्यांदाच आपल्या मुलीबद्दल बोलली आहे.
YouTuber लिली सिंह यांनी त्यांचे नवीन पुस्तक 'बी अ ट्रँगल: हाऊ आय वांट फ्रॉम बीइंग लॉस्ट टू गेटिंग माय लाईफ...' लाँच केले. यादरम्यान प्रियंका चोप्राने लिलीशी केलेल्या संवादात सांगितले की, ‘एक नवीन पालक म्हणूनहे नक्कीच बोलेन की, मी माझ्या इच्छा, भीती, माझे पालनपोषण माझ्या मुलावर कधीच लादणार नाही.’
प्रियांका चोप्रा म्हणाली, 'माझा नेहमीच विश्वास आहे की, मुले आपल्या माध्यमातून त्यांचा मार्ग शोधू शकतात. माझा यावर विश्वास आहे. कारण यामुळे मलाही मदत झाली आहे. माझ्या पालकांनी मला कधीच जज केलं नाही आणि त्यामुळे मला माझं आयुष्य घडवण्यात खूप मदत झाली.’ प्रियांका आणि निक यांनी अद्याप आपल्या मुलीचे नाव ठेवलेले नाही.
अलीकडेच प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा म्हणाल्या होत्या की, ‘मी आजी झाल्याचा मला खूप आनंद झाला. आता मी नेहमी हसत असते. मी खूप आनंदी असते.’ याशिवाय बाळाच्या नावाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, 'आम्ही अजून नाव ठेवलेले नाही. पंडित नाम ठेवतील तेव्हा होईल बारसं. आता नाही.’
त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर आजीची आठवण करताना दोन फोटो पोस्ट केले होते. ‘सर्व जण माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करत आहेत. जेव्हा, माझे आई आणि वडील अभ्यास आणि वैद्यकीय करिअरमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा आजीने त्यांना माझ्या संगोपनात मदत केली. ती माझ्या संगोपनाचा, बालपणाचा एक महत्त्वाचा भाग होती’, असे प्रियांका म्हणाली.
हेही वाचा :























