एक्स्प्लोर

Ek Number Movie : ‘टकाटक'नंतर 'एक नंबर... सुपर'मध्ये झळकणार प्रथमेश परब, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Upcoming Marathi Movie : नावाप्रमाणेच एक नंबर कथानक असणाऱ्या 'एक नंबर... सुपर'चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला आहे. 11 मार्च 2022 रोजी 'एक नंबर... सुपर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ek Number Super : समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर विनोदी अंगानं सादर करत रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झालेले दिग्दर्शक मिलिंद कवडे मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'एक नंबर' असं टायटल असलेल्या या चित्रपटाच्या रूपात मिलिंद यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करणारा चित्रपट बनवला आहे. 'टकाटक' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर मिलिंद कवडे यांचा 'एक नंबर... सुपर' हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे.

नावाप्रमाणेच एक नंबर कथानक असणाऱ्या 'एक नंबर... सुपर'चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला आहे. 11 मार्च 2022 रोजी 'एक नंबर... सुपर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 'एक नंबर... सुपर' या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. दिग्दर्शनासोबत 'एक नंबर'ची कथा व पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे, तर संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. काहीशा वेगळ्या जॅानरच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे एखादा विचार देणाऱ्या मिलिंद यांच्या कारकिर्दीतील 'एक नंबर... सुपर' हा आणखी एक वेगळ्या पठडीतील चित्रपट आहे.

टायटलप्रमाणेच चित्रपटाचा ट्रेलरही 'एक नंबर' बनला आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, श्रवणीय संगीत, मार्मिक संवाद, नयनरम्य लोकेशन्स आणि विषयाचं गांभीर्य अधोरेखित करणारा हा ट्रेलर तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे. या चित्रपटातील 'बाबूराव...' आणि 'तुकडे तुकडे...' ही गाणी अगोदरच पॅाप्युलर झाली असून याचा फायदा ट्रेलर आणि त्या अनुषंगाने 'एक नंबर... सुपर'लाही नक्कीच होणार आहे.

'टकाटक'नंतर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी मिलिंद यांनी पुन्हा एकदा प्रथमेश परबचीच निवड केली आहे. त्यामुळं या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिलिंद-प्रथमेश जोडीची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. प्रथमेशच्या जोडीला यात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी अशी भलीमोठी मराठी कलाकारांची फौज आहे, जी प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन करणार आहे.

संजय नवगिरे आणि सुनिल मगरे या चित्रपटाचे पटकथा सहाय्यक आहेत. सिनेमॅटोग्राफर हजरत शेख यांच्या नजरेतून हा चित्रपट पहायला मिळणार आहे. अभिनय जगताप यांनी या चित्रपटाचं बँग्राऊंड म्युझिक दिलं असून, संकलनाची जबाबदारी प्रणव पटेल यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Embed widget