एक्स्प्लोर

Paresh Rawal : हेरा फेरीच्या सिक्वेलबाबत परेश रावल यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'फक्त पैशांसाठी...'

'हेरा फेरी' (Hera Pheri) या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.  

Paresh Rawal : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. 'हेरा फेरी' (Hera Pheri) मधला बाबूराव असो वा 'मालामाल वीकली' मधला लीलाराम चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'हेरा फेरी' या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar) , सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचा  'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) हा दुसरा भाग 2006 मध्ये  रिलीज झाला. या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.  नुकत्याच एका मुलाखतीमध्ये, या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे का? असा प्रश्न परेश रावल यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला परेश यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.  

मुलाखतीमध्ये परेश रावल यांना प्रश्न विचारण्यात आला की, ''हेरा फेरी', 'अंदाज अपना अपना' या चित्रपटांचे सिक्वेल कधी रिलीज होणार? या सिक्वेलनमध्ये काम करण्यासाठी तुम्ही किती एक्सायडेट असाल?' या प्रश्नाला परेश यांनी उत्तर दिलं, 'मला जर पुन्हा धोती आणि चष्मा घालून तशी भूमिका करावी लागली तर मी फक्त पैशांसाठी एक्सायडेट असेल, त्यापेक्षा जास्त कोणत्याही गोष्टींसाठी एक्सायडेट नसेल.'
 
पुढे परेश रावल यांनी सांगितलं, 'लगे रहो मुन्ना भाई हा चित्रपट सिक्वेल्सचे उत्तम उदाहरण आहे. चित्रपटांचे सिक्वेल्स असेच असले पाहिजेत. जर आम्ही हेरा फेरीचा सिक्वेल कूप वर्षानंतर तयार केला आणि त्यामध्ये तेच जुने जोक्स वापरले तर तो चित्रपट प्रेक्षकांना आवडणार नाही. त्यामध्ये काही बदल करावे लागतील. जर बदल झाले तरच मी एक्सायडेट असेल. ' काही दिवसांपूर्वी परेश रावल यांचा शर्माजी नमकिन हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Sanjay Raut: राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Vs Asaduddin Owaisi : रझाकारांच्या सरकारचं स्वप्न गाडू, फडणवीसांची ओवैसींवर टीकाBabanrao Lonikar : मराठा समाज बोटाच्या कांड्यावर मोजण्याएवढा, आधी वादग्रस्त विधान नंतर सारवासारवPM Narendra Modi Sabha महाराष्ट्रात मोदी, शाहांच्या सभांचा धडाका;चिमूर,सोलापूर, पुण्यात मोदींची सभाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Sanjay Raut: राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
Embed widget