वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी गायकानं घेतला जगाचा निरोप; मृत्यूचं धक्कादायक कारण समोर
प्रकृतीने साथ सोडताच संपूर्ण ओडिया फिल्म आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. लाखो चाहत्यांची मने जिंकणारा त्यांचा स्वर कायमचा थांबला आहे.

Singer Humane Sagar Passed Away: गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनाच्या जगात चाहत्यांना धक्का देणाऱ्या बातम्या येत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या तब्येतीबाबत येणाऱ्या खबरांमुळे अस्वस्थता वाढलेली असताना आता एक वाईट बातमी समोर आली आहे. ओडिया संगीतसृष्टीतील लोकप्रिय गायक ह्यूमन सागर (Humane Sagar) यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी या गायकाने जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने झगडत असलेल्या या गायकाच्या मृत्यू मागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. (Odia Singer Death)
सिंगरच्या निधनानंतर त्याची आई शेफाली यांनी ह्युमनचे मॅनेजर आणि इव्हेंट आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत .त्यांच्या म्हणण्यानुसार, ह्यूमनची तब्येत अत्यंत खराब असतानाही त्यांनी जबरदस्तीने स्टेजवर परफॉर्म करण्यास सांगितले .तो अशक्त होता तरीही त्याला स्टेजवर ढकललं असा आरोप त्यांनी केलाय .त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे .
अवयवांनी काम करणे थांबवले...
गायक ह्युमन सागर यांना 14 नोव्हेंबर रोजी दुपारी गंभीर अवस्थेत AIIMS भुवनेश्वर येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तात्काळ त्यांना मेडिकल ICU मध्ये हलवून अनेक तपासण्या केल्या. रिपोर्ट्समध्ये उघड झाले की ते अक्यूट-ऑन-क्रोनिक लिव्हर फेल्युअर, बायलेटरल न्यूमोनिया आणि डायलटेड कार्डिओमायोपथी यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देत होते. त्यांच्या शरीरातील अनेक महत्त्वाचे अवयव काम करणे थांबवल्याने त्यांची परिस्थिती झपाट्याने बिघडली आणि सोमवार संध्याकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.
“आजारी असूनही परफॉर्म करण्यास लावले”
सिंगरच्या निधनानंतर त्यांच्या आई शेफाली यांनी ह्युमनचे मॅनेजर आणि इव्हेंट आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ह्युमनची तब्येत अत्यंत खराब असतानाही त्यांना जबरदस्तीने स्टेजवर परफॉर्म करण्यास सांगितले गेले. “तो अशक्त होता, चालणं अवघड होतं, तरीही त्याला स्टेजवर ढकललं,” असा आरोप त्यांनी केला आहे.
ओडिया संगीताला दिलेली नवी ओळख
‘इश्क तू ही तू’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ह्युमन सागर यांनी काही वर्षांतच अपार लोकप्रियता मिळवली. त्याच्या आवाजातील खोली व भरीवपणामुळे अनेक अल्बम सुपरहिट ठरले. हिंदीतही 'मेरा ये जहां' या अल्बममधून त्यांनी स्वतंत्र छाप पाडली. ओडिशातील जवळजवळ प्रत्येक घरात त्यांची गाणी आजही ऐकू येतात आणि आता त्यांच्या अकाली जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
























