एक्स्प्लोर

Soyarik :  एकीकडे कुटुंब दुसरीकडे प्रेम, नितीश आणि मानसीची ‘सोयरीक’ जुळणार का?

Marathi Movie Update : ‘लग्न हा विषय आमचा वैयक्तिक आहे’, असं नवी पिढी स्पष्टपणे म्हणू लागली आहे. यावर प्रभावी भाष्य करणारा मकरंद माने दिग्दर्शित ‘सोयरीक’ हा चित्रपट 11 फेब्रुवारी ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Soyarik Movie : ‘सोयरीक’ (Soyarik) जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. लग्न ठरवण्याच्या, करण्याच्या आणि ‘निभावण्याच्या’ ठरलेल्या पारंपरिक चौकटी मोडून आपल्या पसंतीला प्राधान्य देत लग्न जुळवण्याकड़े आणि त्याबाबत बंधनं असू नयेत, असा विचार करणारी आजची जनरेशन आहे.

‘लग्न हा विषय आमचा वैयक्तिक आहे’, असं नवी पिढी स्पष्टपणे म्हणू लागली आहे. यावर प्रभावी भाष्य करणारा मकरंद माने दिग्दर्शित ‘सोयरीक’ हा चित्रपट 11 फेब्रुवारी ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

नितीश आणि मानसीची नवी कोरी जोडी

‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण आणि मानसी भवाळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. आजवर आपल्या चित्रपटांतून समाजातील वेगवेगळे विषय मार्मिकपणे मांडणाऱ्या लेखक-दिग्दर्शक मकरंद माने यांची ही कलाकृती नातेसंबधातील मंथन घडवणारी आहे.

विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने यांची निर्मीती असलेल्या ‘सोयरीक’ चित्रपटात शशांक शेंडे, किशोर कदम, छाया कदम, उमेश जगताप, राजश्री निकम, शंतनू गंगणे, विराट मडके, प्रियदर्शनी इंदलकर, विनम्र भाबल, निता शेंडे, योगेश निकम, अतुल कासवा, संजीवकुमार पाटील, अपर्णा क्षेमकल्याणी  आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘सोयरीक’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेक नावाजलेल्या कलाकारांना एकत्र पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. उत्तम संहिता, दर्जेदार अभिनय आणि वेगळी दिग्दर्शकीय शैली यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे.

लग्नाविषयी, त्यापेक्षाही सहजीवनाविषयी आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकली विचार करतेय. पण, या व्यावहारिकतेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंय, एकमेकांच्या अपेक्षांचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याएवढी परिपक्वता खरंच आली आहे का? हे देखील पहाणं गरजेचं आहे’, असं दिग्दर्शक मकरंद माने सांगतात.

कुटुंबांना जोडणारी सोयरीक

‘सोयरीक’ किंवा ‘लग्न जुळवणे’ ही कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते. 'समाजाच्या दोन आर्थिक स्तरांच्या विचारपद्धतीत बहुतांशी वेळा फरक दिसून येतो. एकीकडे स्वाभिमानाला जपणारी, जातीपातीचा विचार करून आपल्या समाजाशी एकनिष्ठ राहू पाहणारा वर्ग तर दुसरीकडे समाजातील आपली प्रतिष्ठा,ऐश्वर्य,उच्च-नीचता याला प्राधान्य देत संबध जोडणारी मंडळी यांचा संघर्ष घडताना आपण पहातो, अनुभवतो. ‘सोयरीक’ जोडताना या भावना प्रकर्षाने आपल्यासमोर येतात. मुलामुलांच्या आवडीनिवडीचा विचार न करता, आपल्या सोयीनुसार जोडलेली ‘सोयरीक’ अनेक समस्यांना जन्म देते. ‘सोयरीक’ चित्रपट याच विषयाला आपल्यासमोर प्रभावीपणे मांडतो.

‘सोयरीक’ चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी तर संकलन मोहित टाकळकर यांचे आहे. वैभव देशमुख यांच्या गीतांना विजय गवंडे यांचे संगीत आहे. अजय गोगावले यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Embed widget