Netflix Ban in Russia: रशिया-युक्रेन युद्धाचा मनोरंजनविश्वावरही परिणाम, नेटफ्लिक्सकडून रशियातील सेवा स्थगित!
Netflix Ban in Russia: Netflix सध्या चार रशियन सिरीजवर काम करत होते, ज्याच्या शूटिंग सध्या सुरु होत्या. मात्र, आता त्या पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत.
Netflix Ban in Russia: युक्रेन देशावरील थेट आक्रमणाच्या (Ukraine-Russia War) निषेधार्थ नेटफ्लिक्सने (Netflix) रशियामधील आपली सेवा निलंबित केली आहे. Variety.com च्या अहवालानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सने घोषित केले की, ते रशियामधील भविष्यातील सर्व प्रकल्प थांबवतील. आता रशियाशी संबंध तोडणाऱ्या कंपन्यांच्या यादीत नेटफ्लिक्स देखील सामील झाले आहेत.
Netflix सध्या चार रशियन सिरीजवर काम करत होते, ज्याच्या शूटिंग सध्या सुरु होत्या. मात्र, आता त्या पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत. आता कंपनी आपली सेवा पूर्णपणे बंद करण्यासाठी पुढचे पाऊल उचलत आहे. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘सध्याची युद्ध परिस्थिती पाहता, आम्ही रशियामधील आमची सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.’
रशियातून अनेक कंपन्या बाहेर!
युक्रेनशी युद्ध करण्याच्या निर्णयामुळे रशियाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. देश केवळ व्यापक निर्बंधांनीच ग्रासलेला नाही, तर अनेक कॉर्पोरेशन आणि संस्था रशियामधून बाहेर पडल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि डेलसारख्या कंपन्यांनी घोषणा केली आहे की, त्यांनी देशातील विक्री स्थगित केली आहे. तर, Ikea ने देखील आपले रशियातील स्टोअर बंद केले आहेत आणि Nikeने देखील यापुढे ऑनलाइन ऑर्डर पूर्ण करणार नसल्याचे म्हटले आहे.
नेटफ्लिक्स हा प्लटफॉर्म रशियामध्ये काहीसा नवाखा आहे. नेटफ्लिक्स 2016मध्ये रशियात आपली सेवा सुरू केली होती. इतर देशांच्या मानाने इथे युझर्स देखील कामी होते. जागतिक स्तरावर नेटफ्लिक्सचे 222 दशलक्ष सदस्य आहेत. रशियात ही सेवा तेथील स्थानिक नॅशनल मीडिया ग्रुपसह संयुक्त उपक्रम म्हणून चालवली जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
Russia Ukraine War : दोन अमेरिकन शास्त्रज्ञ अनेक महिन्यांपासून रशियन कॅप्सूलमध्ये बंद, बाहेर सुरु असलेल्या युद्धाची कल्पनाच नाही
-
Ukraine Russia War : सुमी शहरातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाची योजना, भारतीयांना तयार राहण्याच्या सूचना
- Ukraine-Russia War: पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात 35 मिनिट झाली चर्चा, 'या' मुद्द्यांवर झालं बोलणं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha