Nawazuddin Siddiqui : नवाजला सतावतेय आईची आठवण
लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फायदा कुणी करून घेतला असेल तर तो नवाजुद्दिन सिद्दीकीने. लॉकडाऊन काळात त्याने मुंबई सोडली होती. आता तो मुंबईत परत आला आहे. पण इथे आल्यावर त्याला काही गोष्टींची खूप आठवण येते आहे.
मुंबई : लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फायदा कुणी करून घेतला असेल तर तो नवाजुद्दिन सिद्दीकीने. लॉकडाऊन काळात त्याने मुंबई सोडली होती. हा संपूर्ण काळ तो होता आपल्या आईसोबत, बुधाना या गावी. जवळपास लॉकडाऊनचे चार ते पाच महिने तो तिथे राहिला. आता तो मुंबईत परत आला आहे. अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणची चित्रिकरणं पुन्हा सुरू झाली आहेत. त्यात नवाजच्या चित्रकृतींचाही समावेश होतोय. पण इथे आल्यावर त्याला काही गोष्टींची खूप आठवण येते आहे.
नवाजुद्दिन मुंबईत आल्यावर आता तिथल्या कोणत्या गोष्टीची तुला सर्वात जास्त आठवण येते असं विचारल्यावर नवाज चटकन नाव घेतो ते आपल्या आईचं. तो म्हणतो, 'मला माझ्या अम्मीची जास्त आठवण येते. कारण इतके दिवस तिच्यासोबत मी दिवस घालवले आहेत. आता इथे मुंबईत आल्यावर मला सगळ्यात जास्त तिची उणीव भासते. आणि तिच्यासोबत भासते ती टायगरची उणीव. टायगर म्हणजे आमचा कुत्रा. आईला सध्या इथे आणणं शक्य नाही. कारण, मुंबई आणि माझं गाव यात खूप अंतर आहे आणि दुसरीकडे टायगर इकडे येऊच शकतो. पण त्याची गरज इथल्यापेक्षा जास्त तिकडे आहे.'
लॉकडाऊन काळात मी माझ्या गावी असल्यामुळे खूप मजा केली. बऱ्याच काळानंतर मी गावी इतके दिवस राहिलो होतो. आता त्याची सवय झाली. आता अचानक मुंबईत आल्यानंतर मला माझ्या गावची आठवण येते आहे. कधी कधी वाटतं परत जावं का. पण आता कामही करायला हवं. सध्या मी ठरवलेल्या काही प्रोजेक्टचं काम सुरू होणार आहे. शिवाय येणारं वर्षंही माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी खूप वेगळ्या भूमिकांमध्ये तुम्हाला दिसणार आहे. खरंतर त्याचा विचार मीही कधी केला नव्हता. पण 2021 मध्ये माझं नवं रूप तुम्हाला पाहता येईल, असंही तो म्हणाला.
नवाजुद्दिन सिद्दीकी हा अत्यंत मेहनतीने पुढे आलेला कलाकार आहे हे आपण सगळेच जाणतो केवळ चित्रपट नव्हे तर ओटीटी व्यासपिठांवरही तो चमकला. त्याच्या सेक्रेड गेम्सने अनेकांना वेड लावलं. आता येत्या काळात चित्रपटांसोबत तो काही ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दिसणार आहे. आता त्यातल्या भूमिका काय असतील, तो कधी यात दिसेल हे मात्र अद्याप नक्की झालेलं नाही. वेळ आली तर मी सगली माहिती तुम्हाला देईन असंही तो म्हणाला.