Mandana Karimi : मंदाना करीमीचे दिग्दर्शकासोबत होते सिक्रेट अफेअर, अभिनेत्रीच्या आयुष्यातील ‘ती’ घटना ऐकून कंगनाच्या डोळ्यात पाणी!
Mandana Karimi : या शोमध्ये मंदानाने सांगितले की, जेव्हा ती तिच्या पतीपासून विभक्त झाली आणि वेगळी राहत होती, यादरम्यान ती एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
Mandana Karimi : कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'लॉक अप' (Lock Upp) शोच्या संकल्पनेनुसार, प्रत्येक स्पर्धकाला शोमध्ये टिकून राहण्यासाठी आणि ट्रॉफीच्या जवळ जाण्यासाठी त्यांचे सर्वात धक्कादायक रहस्य शेअर करावे लागते. या आठवड्यात ही संधी मंदाना करीमी (Mandana Karimi), पायल रोहतगी, सायेशा शिंदे आणि शिवम शर्मा यांना देण्यात आली होती. मंदाना करीमीला बजर राऊंडमध्ये ही संधी मिळाली, कारण तिने प्रथम बजर दाबला. यानंतर तिने तिचे सर्वात धक्कादायक रहस्य उघड केले. या धक्कादायक रहस्यामुळे शोमधील सर्व स्पर्धक, अगदी होस्ट कंगना रनौत देखील भावूक झाली.
या शोमध्ये मंदानाने सांगितले की, जेव्हा ती तिच्या पतीपासून विभक्त झाली आणि वेगळी राहत होती, यादरम्यान ती एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मंदाना म्हणाली, ‘जेव्हा घटस्फोटानंतर मी माझ्या आयुष्याशीशी संघर्ष करत होते, तेव्हा माझे एक सिक्रेट अफेअर होते. महिलांच्या हक्कांबद्दल बोलणाऱ्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाशी माझे रिलेशन होते. तो अनेकांसाठी आदर्श आहे. या दरम्यान आम्ही प्रेग्नेंसी प्लॅन केली आणि जेव्हा ते घडलं, तेव्हा खरंच माझं सगळं बिघडलं…’ यावेळी मंदानाने तिच्या जबरदस्तीच्या गर्भपाताची घटनाही सांगितली. आता पुढे काय झालं, हे एपिसोड पाहिल्यानंतरच कळेल. शोच्या सध्या सुरू असलेल्या प्रोमोमध्ये एवढेच सांगण्यात आले आहे.
आपले गुपित सांगताना मंदानाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती ढसाढसा रडू लागली. तिच्यासोबत शोमधील सर्व कैदीही भावूक झाले. यावेळी होस्ट कंगनालाही तिचे अश्रू रोखणे कठीण झाले आणि ती आपले डोळे पुसताना दिसली.
मंदाना करीमीने जानेवारी 2017 मध्ये बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघे दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण, लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी दोघे वेगळे झाले. मंदानाने गौरव आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला.
हेही वाचा :
- Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध स्वतःच्या आईला घराबाहेर काढणार? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!
- Alia Bhatt,Ranbir Kapoor : रणबीरची होणारी 'दुल्हनिया' आलियाकडे भारताचं नागरिकत्व नाही; मुंबईत जन्म पण...
- Dasvi Twitter Review : अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ला प्रेक्षकांनी केलं ‘पास’! सोशल मीडियावरही चित्रपटाची हवा!