एक्स्प्लोर

Vijay Rashmika: लग्नाची धामधूम संपते ना संपते, तोवर रश्मिका- विजयची चाहत्यांना गुड न्यूज; चाहत्यांना आश्चर्याचा धक्का!

त्यांच्या गुड न्यूजमुळे चाहत्यांनाही आनंद झालाय. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Rashmika -vijay: साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना या दोघांनी उदयपूरमध्ये राजेशाही थाटात विवाह केला. त्यांच्या लग्नातील फोटोची सध्या एकच क्रेझ आहे. पारंपरिक पद्धतीने केलेल्या या लग्नाची अनेकांना भुरळ पडली आहे. लग्नाची धामधूम संपते ना संपते तोच रश्मिका आणि विजयने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. त्यांच्या गुड न्यूजमुळे चाहत्यांनाही आनंद झालाय. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आता लग्न तर झालं आणखी काय गुड न्यूज? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. याचे उत्तरही तेवढेच खास आहे. 

खऱ्या आयुष्यात एकत्र आल्यानंतर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेही आता मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या आगामी राणाबली या चित्रपटाचा खास लुक समोर आला असून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टर्स सोबत चाहत्यांना आज एक विशेष सरप्राईज मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

ऐतिहासिक सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'मैत्री मूवी मेकर्स'ने शेअर केलेल्या या पोस्टर मध्ये राणाबली आणि जयम्मा एकमेकांचे हात हातात धरलेले दिसत आहेत . अर्थात राणा बलीची भूमिका विजय देवरकोंडा साकारणार आहे. तर जयम्मा रश्मिका मंदाना असेल. या पोस्टर मध्ये दोघांचेही चेहरे दिसत नसले तरी त्यांच्या केमिस्ट्रीची एकच चर्चा आहे. राणावली चित्रपटाची पार्श्वभूमी ही ऐतिहासिक आहे. ही केवळ एक प्रेम कथा नसून अठराव्या शतकातील रायल सीमा भागाच्या इतिहासावर असणारा हा थरारपट आहे. राहुल संकृत्यान या दिग्दर्शकांना ब्रिटिश काळातील संघर्ष आणि शोषण या चित्रपटात दाखवलंय. गीता गोविन्दम आणि डियर कॉम्रेड या दोन्ही चित्रपटांच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर विजय आणि रश्मिका पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून एकत्र येत आहेत. या सिनेमाकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत. दोघांची जोडी ही पुन्हा एकदा समोर येणार असल्याचे कळताच चाहते आनंदी झाले आहेत. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रश्मिका आणि विजयने 26 फेब्रुवारीला उदयपूर मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या निर्मात्यांनी नव्या चित्रपटाचे पोस्टर समोर आणल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राणावली हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हॉलीवुड अभिनेता अर्नोल्ड वोस्लू खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला अजय अतुलने संगीत दिले आहे.दरम्यान पोस्टर प्रदर्शित करताना निर्मात्यांनी आज चाहत्यांना सरप्राईज मिळणार असल्याचे सांगितलं. आज कदाचित या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होऊ शकतो अशी अटकळ चाहते बांधत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच रुचिताने मागितली प्रेक्षकांची माफी, पोस्ट करत म्हणाली...
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच रुचिताने मागितली प्रेक्षकांची माफी, पोस्ट करत म्हणाली...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
Embed widget