Kantara OTT Release : बॉक्स ऑफिसवरील दमदार यशानंतर 'कांतारा' आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज; चार भाषांमध्ये होणार सिनेमाचे प्रदर्शन
Kantara OTT Release : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जवळपास दोन महिन्यांपासून धूमाकूळ घालतोय. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार आहे.
Kantara OTT Release : ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) 'कांतारा' चित्रपटाने (Kantara Movie) जादू सर्वत्र पसरली आहे. या सिनेमाने केवळ कन्नड भाषेमध्येच नाही तर हिंदी भाषेतही दमदार कामगिरी केली आहे. हा ब्लॉकबस्टर चित्रपट अवघ्या 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला भारतभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी (OTT Platform Release) सज्ज झाला आहे.
ओटीटीवर होणार धमाका
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटात प्रथा आणि परंपरांचे सुंदर चित्रिकरण करण्यात आले आहे. कांतारा या चित्रपटाची निर्मिती होंबळे फिल्म्सने केली आहे. लाखो चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण निर्मात्यांनी 'कांतारा'ची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. कांतारा हा सिनेमा 24 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून Amazon Prime Video वर स्ट्रीम होत आहे.
हिंदी व्हर्जनसाठी प्रतीक्षा करावी लागेल
कांतारा सिनेमा जरी ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी मात्र 'कांतारा'च्या हिंदी व्हर्जनसाठी हिंदी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा चित्रपट सध्या फक्त मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्ये OTT वर पाहता येईल. अवघ्या 20 कोटींमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता 'कांतारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जसा धमाका केला तसाच धमाका ओटीटीवरही होणार का? हे पाहावं महत्वाचं ठरणार आहे.
प्राईम व्हिडीओने कांतारामधील वराह रूपम गाणे काढून टाकले
थक्कुडम ब्रिज यांनी त्यांच्या 'नवरसम' आणि 'वराह रूपम' या गाण्यांचा कोलाज शेअर करून लिहीले आहे की, 'अमेझॉन प्राईमने 'कांतारा' चित्रपटातून आमच्या 'नवरसम' गाण्याचे साहित्यिक व्हर्जन 'वराह रूपम' गाणे काढून टाकले आहे. आमचे संगीतकार, चाहते आणि माध्यमांचे आभार ज्यांनी त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला". असे बोलून त्यांनी सगळ्यांचे आभारही मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या :