Kantara On OTT : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर 'कांतारा' आता ओटीटीवर! जाणून घ्या कुठे होणार रिलीज?
Rishabh Shetty : ऋषभ शेट्टीचा बहुचर्चित 'कांतारा' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Kantara OTT Release Date : सिनेप्रेमींमध्ये सध्या 'कांतारा' (Kantara) या सिनेमाची चर्चा आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या एक महिन्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.
'कांतारा' या सिनेमाचे प्रचंड कौतुक झाले. पण काही प्रेक्षकांना हा सिनेमा सिनेमागृहात पाहता आला नाही. पण आता ते घरबसल्या हा सिनेमा पाहू शकतात. हा सिनेमा प्रेक्षकांना 24 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. आधी हा सिनेमा 4 किंवा 18 नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज होणार होता पण सिनेमागृहातील सिनेप्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलली.
'कांतारा'ची कमाई...
'कांतारा' हा कन्नड सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने केजीएफ सिनेमालादेखील मागे टाकलं आहे. हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 330 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड्स केले आहेत.
View this post on Instagram
हिंदी व्हर्जनलाही मिळाली प्रेक्षकांची पसंती
'कांतारा' या सिनेमाची निर्मिती फक्त 16 कोटींमध्ये करण्यात आली आहे. या सिनेमाने साऊथसह हिंदीतही धुमाकूळ घातला आहे. हिंदीत हा सिनेमा 14 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. हिंदीत या सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे. आधी हा सिनेमा फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. पण या सिनेमाला मिळालेल्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी हा सिनेमा तामिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. इतर भाषेत प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या सिनेमाची कन्नड आवृत्ती ब्लॉकबस्टर ठरली. तर दुसरीकडे इतर भाषांमध्येही या सिनेमाने आपली चुणूक दाखवली आहे.
'कांतारा' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा ऋषभ शेट्टीने सांभाळली आहे. 'कांतारा' या सिनेमात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या