एक्स्प्लोर

Jhund : 'झुंड'चे खरे हिरो नागपूरचे विजय बारसे; 'स्लम सॉकर' काय आहे? ज्यावर बनलाय सिनेमा...

Jhund Movie : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Jhund Movie : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला "झुंड" (Jhund Hindi Cinema) चित्रपट 4 मार्चला प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय बारसे यांनी 21 वर्षांपूर्वी नागपुरात "स्लम सॉकर" (Slum Soccer) अर्थात झोपडपट्टी फुटबॉलची सुरुवात केली होती. 

झोपडपट्टीतील वातावरणात वाईट सवयी, अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक मुले गुन्हेगारी विश्वात जात असल्याचे विजय बारसे यांच्या लक्षात आले. त्यानंतर विजय बारसे यांनी वर्ष 2000 मध्ये स्लम सॉकरची संकल्पना मांडली. फुटबॉल या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध फुटबॉलपटू तर बनवता येईल. शिवाय त्यांच्या जीवनाला योग्य वळण लावत गरीब कुटुंबातील मुलांना प्रगतीची नवी संधी ही उपलब्ध करून देता येईल असे विजय बारसे यांचे उद्दिष्ट होते.

त्यासाठी विजय बारसे यांनी नागपुरातील बोखारा भागात झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच जवळच्या शाळेत त्यांच्या शिक्षणाची सोय करत अशी निवासी अकॅडमी सुरू केली. क्रीडा आणि अभ्यास दोन्ही प्रकारात गरीब मुलांना संधी उपलब्ध करून दिली की ते प्रगतीची वाट स्वतः निर्माण करतील असा विजय बारसे यांचा विश्वास होता.

 हळू हळू स्लम सॉकरचा आकार वाढत गेला. आधी नागपूर, नंतर विदर्भ आणि हळू हळू महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात तसेच देशाच्या 24 राज्यात स्लम सॉकर पसरले. गेले दोन दशके दरवर्षी देशभर होणाऱ्या स्लम सॉकर स्पर्धांमध्ये 4 लाख मुले खेळलेली आहे.

विजय बारसे यांच्या प्रेरणेने झोपडपट्टी फुटबॉलसह जोडले गेलेले अनेक मुलांनी क्रीडा विश्वात तर प्रगती केलीच शिवाय अनेकांनी शिक्षणात चांगली प्रगती करत आपले जीवन घडवले. वंचित घटकातील हजारो मुलांसाठी विजय बारसेंनी केलेली मेहनत आणि त्यांच्या गेल्या दोन दशकातील संघर्ष "झुंड" चित्रपट माध्यमातून नागराज मंजुळे यांनी सर्वांसमोर मांडलं आहे. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार
Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Narhari Zirwal: नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत, लाचखोरी प्रकरणामुळे प्रचंड कोंडी
नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाचे आयोजक वाट पाहत बसले पण....
Embed widget