Jhund : मराठीमध्ये झुंड का नाही? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं कारण
नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) झुंड (Jhund) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
![Jhund : मराठीमध्ये झुंड का नाही? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं कारण Jhund film why this film is not in marathi Language Nagraj Manjule give answer Jhund : मराठीमध्ये झुंड का नाही? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/5aa3f835e42ee0b9773fc6a962be9afc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jhund : सैराटच्या (Sairat) यशानंतर आता नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) पहिला हिंदी चित्रपट झुंड (Jhund) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'झुंड' या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर होत आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एबीपी माझानं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये नागराज मंजुळेनं उपस्थिती लावली. यावेळी त्याला असा प्रश्न विचारण्यात आला की, 'झुंड हा चित्रपट मराठी भाषेत का तयार करण्यात आला? असा प्रश्न काही लोक विचारत आहेत.' या प्रश्नाला नागराजनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
नागराज म्हणाला, 'मी म्हणतो पुष्पा मराठीत का नाही आला. तो चित्रपट हिंदी किंवा तेलगूमध्ये का लोकांनी पाहिला? सोशल मीडियावर चर्चा होते. पण ती चर्चा स्पेसीफिक नसते. मराठी भाषेत हा चित्रपट केला पाहिजे पण त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे. अमिताभ बच्चन यांनी त्यासाठी मराठी शिकलं पाहिजे आणि त्यासाठी प्रोड्यूसरनं तेवढे पैसे दिले पाहिजे. फेसबुकवर कोणताही प्रश्न मांडणं सोप्प आहे.'
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आकाशनं संभ्या ही भूमिका तर रिंकूनं मोनिका ही भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- Ranveer Singh : 'जबरा फॅन'; पाठीवर काढला टॅटू, रणवीर म्हणाला...
- Jhund : झुंड पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले; म्हणाला, काय जबरदस्त काम केलंय यार...
-
Jhund : 'झुंड' चित्रपटासाठी बिग बींनी घेतलं कमी मानधन; म्हणाले, 'माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)