Jhund : झुंड पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले; म्हणाला, काय जबरदस्त काम केलंय यार...
अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) नुकताच 'झुंड' हा चित्रपट पाहिला.
Amitabh Bachchans Jhund : 'झुंड' (Jhund) या चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहुन प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) नुकताच हा चित्रपट पाहिला. आमिरसाठी या चित्रपटाचं प्रायव्हेट स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले. टी सीरिजनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आमिर झुंड चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
झुंड चित्रपट पाहिल्यानंतर आमिर म्हणाला, 'हा चित्रपट यूनिक आहे. सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. मी 20 -30 वर्षात जे काही शिकलो त्या सर्व गोष्टींचा यांनी फूटबॉल केलाय, असं म्हणता येईल. ' या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाबद्दल आमिर म्हणाला, 'अमिताभ बच्चन यांनी अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे पण हा त्यांच्या सर्वात चांगल्या चित्रपटांमधील एक चित्रपट आहे. तसेच या चित्रपटात लहान मुलांनी देखील चांगलं काम केलं आहे. ' चित्रपट पाहिल्यानंतर आमिर या चित्रपटातील कलाकारांना भेटला.
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- Ranveer Singh : 'जबरा फॅन'; पाठीवर काढला टॅटू, रणवीर म्हणाला...
- Jhund : 'झुंड' चित्रपटासाठी बिग बींनी घेतलं कमी मानधन; म्हणाले, 'माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha