एक्स्प्लोर

Theaters In Kashmir : तीन दशकांची प्रतीक्षा अखेर संपली! आता काश्मीरमध्ये मोठ्या पडद्यावर पाहता येणार चित्रपट!

Theaters In Kashmir : काश्मीरमधील (Kashmir) मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. काश्मीरमध्ये आजपासून मल्टिप्लेक्स सुरु होणार आहे.  

Theaters In Kashmir : काश्मीरमधील (Kashmir) मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. 1990च्या दशकाच्या सुरुवातीस काश्मीर खोऱ्यातील सर्व थिएटर बंद करण्यात आले होते. 1996 मध्ये ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्याला यश आले नाही. मात्र, आज या ठिकाणी थिएटर सुरु होणार आहे. आता राज्य प्रशासन या ठिकाणी काम करत असून, येथे चित्रपटांचे शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन, तसेच थिएटर सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आतापर्यंत 500 चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरमध्ये शूटिंगसाठी अर्ज केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) स्टारर 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसह मल्टिप्लेक्स आजपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. 30 सप्टेंबरपासून हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) अभिनीत ‘विक्रम वेधा’च्या (Vikram Vedha) स्क्रीनिंगसह चित्रपटांचे नियमित शो सुरू होतील. काश्मीरच्या पहिल्या या मल्टिप्लेक्समध्ये एकूण 520 आसनक्षमतेची तीन चित्रपटगृहे आहेत. स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने थिएटरच्या आवारात 'फूड कोर्ट' देखील असणार आहे.

काश्मीरवासीयांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार!

INOX द्वारे चालवल्या जाणाऱ्या मल्टिप्लेक्सचे नियोजित उद्घाटन आज केले जाणार आहे. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते रविवारी, पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात प्रत्येकी एका बहुउद्देशीय सिनेमा हॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे.

काश्मीरच्या खोऱ्यातील चित्रपटगृहे तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा सुरू झाली आहेत. दहशतवाद्यांच्या धमक्या आणि हल्ल्यांमुळे घाटीतील थिएटर मालकांनी 1989-90मध्ये सगळे थिएटर बंद केले होते. हा प्रसंग ऐतिहासिक असल्याचे सांगत, सिन्हा म्हणाले की, ‘आम्ही लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये देखील येऊ. अशा बहुउद्देशीय सिनेमा हॉल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बांधण्यात येईल. मी असा सिनेमा हॉल पुलवामा आणि शोपियानच्या तरुणांना समर्पित करत आहे.’

इतिहासाच्या पावलावर ठेवलंय पाऊल!

श्रीनगरमध्ये सुरू होणारे INOX मल्टिप्लेक्स हे बदामी बाग मिलिटरी कॅन्टोन्मेंट परिसरात बांधले गेले आहे, जिथे एकेकाळी 1965 मध्ये ब्रॉडवे सिनेमा असायचा. ‘ब्रॉडवे सिनेमा’ हा आता इतिहासजमा झाला आहे आणि त्या इतिहासाच्या पायावरच बदलत्या काश्मीरची घोषणा करणारे हे मल्टिप्लेक्स उभे राहिले आहे. या मल्टिप्लेक्सचे काम पूर्ण व्हायला 2 वर्षे लागली आहेत. या मल्टीप्लेक्ससोबतच अनंतनाग, श्रीनगर, बांदीपोरा, गंदरबल, डोडा, राजौरी, पुंछ, किश्तवाड आणि रियासी येथे देखील लवकरच सिनेमा हॉलचे उद्घाटन होणार असल्याचे देखील ते म्हणाले.

हेही वाचा :

Video : राणा दग्गुबातीने हिसकावला सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याचा फोन, रागावण्याऐवजी चाहते झाले खुश! पाहा नेमकं काय झालं...

Happy Birthday Mahesh Bhatt : बॉलिवूडचे ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ महेश भट्ट! लग्नानंतरही अनेक अभिनेत्रीसोबत जोडले गेले नाव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget