एक्स्प्लोर

Video : राणा दग्गुबातीने हिसकावला सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याचा फोन, रागावण्याऐवजी चाहते झाले खुश! पाहा नेमकं काय झालं...

Rana Daggubati Viral Video: ‘बाहुबली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati ) याने नुकतेच तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले.

Rana Daggubati Viral Video: ‘बाहुबली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati ) याने नुकतेच तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी मिहीका बजाज आणि वडील डी सुरेश बाबू देखील उपस्थित होते. देव दर्शन झाल्यानंतर राणा दग्गुबाती मंदिराच्या आवारात फिरत होता आणि त्याच्या आजूबाजूला फोटोग्राफार्स आणि चाहत्यांचा गराडा पडला होता. यावेळी त्याने फोटोग्राफर्सनादेखील मागे थांबण्यास सांगितले होते. दरम्यान, मध्येच एक चाहता आला आणि त्याच्यासोबत सेल्फी काढू लागला, तेव्हा राणाने त्याचा फोन हिसकावून घेतला.

अभिनेता राणा दग्गुबातीच्या या कृत्याने आधी चाहते चक्रावले. मात्र, नंतर अभिनेत्याचे उत्तर ऐकून त्याच्यावर नाराज होण्याऐवजी खुश झाले.

पाहा व्हिडीओ:

नेमकं काय झालं?

अभिनेता राणा दग्गुबाती देव दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आवारात फेरफटका मारत होता. यावेळी त्याला चाहत्यांनी घेरले होते. याचवेळी अचानक एक चाहता राणाकडे धावत आला आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागला. राणा दग्गुबातीला (Rana Daggubati) चाहत्याच्या या कृत्याचा राग आला आणि राणाने त्याचा फोन हिसकावून घेतला. मात्र, नंतर त्याने हसतमुखाने चाहत्याचा फोन परत केला आणि त्याला मंदिरात सेल्फी न घेण्याची सूचना दिली. 'मंदिरात सेल्फी काढू नका', असे अभिनेता चाहत्याला सांगत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. देव दर्शनाला आल्यावर आधी देव मग बाकी फेरफटका मारणाऱ्या राणाने आपल्या चाहत्याला देखील आधी देव दर्शन करण्यास सांगितले.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया..

राणा दग्गुबातीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर त्याचे चाहते आणि प्रेक्षक देखील भरपूर कमेंट्स करत आहेत. काहींनी राणा दग्गुबातीच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्याच्यावर टीका केली आहे. तर, काहींनी त्याचे कौतुक केले आहे. ‘राणाने असे करायला नको होते’, असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर, दुसऱ्याने लिहिले की, ‘बाहुबलीचा तिसरा भाग येत नसल्याने भल्लालदेव चिडले आहेत.’ तर काही चाहत्यांनी म्हटले की, निदान मंदिरात दर्शन घेत असताना तरी त्यांना एकटं सोडा.

'बाहुबली' फेम राणा दग्गुबाती (Rana Daggubati) शेवट 'विराटपर्वम' या चित्रपटात काम करताना दिसला होता. या चित्रपटात तो साई पल्लवीसोबत रोमान्स करताना दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. अभिनेता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Rana Daggubati : जाणून घ्या 'बाहुबली' फेम राणा दग्गुबातीबाबत खास गोष्टी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Anna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Embed widget