Hemant Dhome : 'मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना…'; अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत
अभिनेता हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.
![Hemant Dhome : 'मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना…'; अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत Hemant Dhome share post for uddhav thackeray goes viral on social media Hemant Dhome : 'मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना…'; अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/af141a2dca4fa9545d21511d8d84ad15_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hemant Dhome : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी (29 जून) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपण आता पुन्हा शिवसेना भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. आता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मराठी चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिल्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं. त्यानंतर आता अभिनेता हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.
हेमंतची पोस्ट
हेमंतनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'धन्यवाद उद्धव ठाकरे, तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार! ' हेमंतच्या या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Thank you @OfficeofUT !!!
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 29, 2022
तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता… कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली… आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरच वाईट वाटतंय… धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार! #thankyou #UddhavThackarey #CM
‘शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधला होता.
हेही वाचा:
Prakash Raj, Uddhav Thackeray : ‘महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील..’, अभिनेता प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)