Hemangi Kavi : 'भांडून लता दीदींचं अंत्यदर्शन घेतलं'; हेमांगीची पोस्ट चर्चेत
हेमांगी कवीनं (Hemangi Kavi) एका नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे
Hemangi Kavi : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. चित्रपटसृष्टी बरोबरच विविध क्षेत्रातील लोकांनी शिवाजी पार्क येथे येऊन लता दीदींचं अंत्यदर्शन घेतलं. पण मराठी कलाकार हे लता दीदींचं अंत्यदर्शन घ्यायला का नव्हते? असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत होते. यावर हेमांगी कवीनं (Hemangi Kavi) उत्तर दिलं आहे.
लता दीदींच अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते पण मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार तिथे का दिसत नव्हते? असा नेटकऱ्यानं प्रश्न विचारला यावर हेमांगीनं उत्तर दिलं, 'सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिलं नाही. मी खूप विनंती केली. मला या गेटवर जा त्या गेटवर जा असं सांगण्यात आलं. नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर आम्ही चार वाजल्यापासून तिथं होतो. शेवटपर्यंत आम्हाला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंह, बेला शेंडे आणि कविता पौडवाल यांना देखील मागे हटवण्यात आलं, तिथं माझी काय गत.'
पुढे पोस्टमध्ये हमांगीनं लिहिले, 'आम्ही तिथे सेलिब्रिटी म्हणून गेलो नव्हतो निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हाला शासकीय प्रोटोकॉल्स कळतात. म्हणून तिथे थांबवून होतो. पण आम्हाला सांगण्यात आलं की वेळ नाहिये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरश: भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं. कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कोणी आलं नसावं. '
लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar : 'आपका साया साथ होगा'; 'अमूल'नं लता दीदींना वाहिली श्रद्धांजली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha