बिग बॉसची ट्रॉफी जिंकली, पण चारचाकी अजूनही मिळाली नाही; गौरव खन्नाचा खुलासा, नेमकं काय म्हणाला?
Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna: बिग बॉस 19ची ट्रॉफी जिंकूनही गौरवला अद्याप चारचाकी गाडी मिळालेली नाही.

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna: बिग बॉस 19चा सिझन प्रचंड गाजला. या सिझनचा विजेता गौरव खन्ना ठरला. त्याला विजेतापद मिळून 1 महिना पूर्ण झाला. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर गौरव खन्नाने डिसेंबरमध्ये स्वत:चे यूट्यूब चॅनेल लाँच केले. त्याने त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये, बिग बॉस घरातील इनसाइड स्टोरी शेअर केली. गौरवने या घरात कसे दिवस काढले? अप्स अँड डाऊनचा कसा सामना केला? याबाबत त्याने माहिती दिली. त्याने या व्हिडिओतून व्यावसायिक प्रवास, अनुपमामधील भूमिका, सेलिब्रिटी मास्टरशेफमधील प्रवास, त्याच्या एकंदरीत कामाबद्दल त्याने माहिती दिली. पण त्यानं नुकतंच एका व्हि़डिओतून खंत व्यक्त केली आहे. बिग बॉसची ट्रोफी जिंकल्यानंतरही त्याला अद्याप चारचारी मिळाली नाही.
अलिकडेच एका यूट्यूब व्लॉगमध्ये गौरवने खुलासा केला की, त्याला शोमध्ये जिंकलेली चारचाकी अद्याप मिळालेली नाही. त्यानं या व्लॉगमधून अंबानी परिवाराच्या इव्हेंटला होस्ट करणार असल्याचं सांगितलं. या व्लॉगमध्ये त्यानं बिग बॉस फेम प्रणित मोरेशी देखील भेट घेतली. त्यानं त्याच्या व्लॉगमधून, कार्यक्रमाच्या आयोजनाच्या तयारीची झलक दाखवली.
अंबानीच्या इव्हेंटचे सुत्रसंचालन करणार
View this post on Instagram
गौरव खन्ना अंबानींच्या एका इव्हेंटचे सुत्रसंचालन करणार असल्याची माहिती आहे. या इव्हेंटबाबत गौरव खन्ना म्हणाले, "एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. हा पूर्णपणे माझ्यासाठी वेगळा अनुभव असेल. या इव्हेंटची स्क्रिप्ट इतकी मोठी आहे की, असं वाटतंय की मी कोणत्यातरी परिक्षेची तयारी करत आहे. मी घोड्यावर बसून स्टेजवर एन्ट्री करणार आहे. या इव्हेंटमध्ये दोन शो असतील. प्रत्येक शोमध्ये सुमारे 40,000 लोक असतील", अशी माहिती गौरव खन्नाने दिली.
शोबाबत माहिती देताना गौरव खन्ना म्हणाला, "मी रिलायन्स फॅमिली शोचे आयोजन करत आहे. जे दरवर्षी धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीदिनी होतो. ही संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मला याआधीही यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, त्यावेळेस संधी मिळाली नव्हती. आता मली ती संधी मिळाली आहे. हे टेलिव्हिजनवर दाखवले जाणार नाही. पण माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे", असं गौरव म्हणाला.
गौरव खन्नाला चारचाकी मिळाली नाही
व्लॉगमध्ये गौरव खन्ना प्रणित मोरेसोबत जेवण करताना दिसत आहे. दोघेही बिग बॉसमधील त्यांच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत होते. व्हिडिओमध्ये नंतर गौरव प्रणितला मिठाईचे पॅकेट देतो. नंतर प्रणित गौरवला विनोदाने, मिठाई नको जिंकलेली गाडी दे, असं म्हणतो. त्यावर गौरव हसतो आणि म्हणतो, 'मला अजून ती गाडी मिळाली नाही", सध्या गौरवचा हा व्लॉग सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
























