एक्स्प्लोर

Depp vs Amber Case: मानहानीच्या प्रकरणात जॉनी डेपचा विजय! एम्बर हर्डला द्यावी लागणार ‘इतकी’ नुकसान भरपाई

Depp vs Amber Case: हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची माजी पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांचा हाय-प्रोफाईल मानहानीचा खटला बराच काळ चर्चेत होता.

Depp vs Amber Case: हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची माजी पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांचा हाय-प्रोफाईल मानहानीचा खटला बराच काळ चर्चेत होता. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यात मागील बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती, ज्यावर आता अखेर हा निकाल देण्यात आला आहे. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर लढाईत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सहा आठवडे चाललेल्या या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. या खटल्यातील न्यायाधीशांनी एम्बर हर्डला या मानहानी खटल्यात दोषी ठरवले आणि निर्णय दिला की, जॉनी डेप यांनी आपली बदनामी झाल्याचे सिद्ध केले आहे. याव्यतिरिक्त, न्यायालयाने एम्बर हर्डला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि 5 दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान असे एकूण 15 दशलक्ष डॉलर भरण्याचे आदेश दिले.

सहा आठवडे चालला खटला!

जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील हाय-प्रोफाइल कायदेशीर लढाई दरम्यान गेल्या सहा आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. गेल्या सहा आठवड्यात शंभरहून अधिक तास साक्षीदार साक्ष देत होते. साक्ष आणि वादविवाद अनेक तास सुरु होते. ज्युरीच्या सात सदस्यांनीही गेल्या तीन दिवसांत तासनतास चर्चा केली आणि त्यानंतर ज्युरी निर्णयावर पोहोचले.

याव्यतिरिक्त, कोर्टाने जॉनी डेपलाही दंड सुनावला आहे. अभिनेत्रीच्या काही मानहानीसाठी तो दोषी आढळला आहे. या संदर्भात अभिनेत्याला 2 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई देण्यास सांगितले गेले आहे. रिपोर्टनुसार, जॉनीच्या बाजूने निकाल लागताच कोर्टाच्या बाहेर जमलेली गर्दी जल्लोष करताना दिसली.

नेमकं प्रकरण काय?

जॉनी आणि एम्बर 2015 ते 2017 पर्यंत पती-पत्नी होते. त्यानंतर, मे 2016 मध्ये एम्बरने डेपविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. यानंतर एम्बरने डिसेंबर 2018 मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्रात एक लेख लिहिला, ज्यात स्वत:ला कौटुंबिक हिंसाचाराचा बळी असल्याचं सांगितलं. यावर जॉनी डेपने एम्बरविरुद्ध खटला दाखल केला आणि 50 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई मागितली होती. प्रत्युत्तरादाखल एम्बरने शारीरिक हिंसा आणि छळाचा दावाही करत 100 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई मागितली होती.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget