Amber Heard , Johnny Depp : जॉनी डेप-एम्बर हर्ड कोर्टात आमने-सामने, सुनावणी दरम्यान ‘या’ व्यक्तीला दाखवला गेला बाहेरचा रस्ता!
Amber Heard , Johnny Depp : अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि अभिनेत्री एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यातील मानहानीच्या खटल्याची पहिल्या आठवड्यातील सुनावणी नुकतीच संपली.
Amber Heard , Johnny Depp : अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि अभिनेत्री एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यातील मानहानीच्या खटल्याची पहिल्या आठवड्यातील सुनावणी नुकतीच संपली आणि यात बरेच धक्कादायक खुलासे केले गेले आहेत. यावेळी जॉनी-एम्बरचे थेरपिस्ट आणि डेपच्या बहिणीची साक्ष ऐकली गेली आहे. अहवालानुसार या खटल्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री एम्बर हर्डच्या मैत्रिणीला कोर्टरूममधून बाहेर काढण्यात आले आहे.
पेज सिक्सच्या अहवालानुसार, एम्बर हर्डची जवळची मैत्रीण, ब्रिटिश संगीत पत्रकार इव्ह बार्लो (Eve Barlow) हिला या सुनावणीतून बेदखल करण्यात आले आहे. कोर्टरूमच्या पुढील रांगेतून मजकूर पाठवताना आणि ट्विट करताना पकडल्यानंतर बार्लोवर बंदी घालण्याचा निर्णय न्यायाधीशांनी घेतला. पेज सिक्सने पुढे म्हटले की, या खटल्यात इव्हने डेपची साक्षीदार जीना ड्युटर्सच्या माहितीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.
कोर्टात नेमकं काय झालं?
बार्लोवर बंदी का घालण्यात आली हे एका स्रोताने पेज सिक्सला सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘इव्ह बार्लोला वाटते की, ती एम्बरच्या कायदेशीर टीमचा एक भाग आहे. डेपच्या वकिलांकडे शेवटी पुरेसे होते आणि तिला कोर्टरूममधून बाहेर काढण्यात आले.’ अहवालात असेही म्हटले आहे की, कोर्टाच्या प्रतिलेखात न्यायाधीशांनी बार्लोने ट्विट केल्याचा आणि कोर्टरूममधून मजकूर पाठवल्याचा उल्लेख केला आहे. तसेच, तिने न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान केला आहे आणि त्यामुळे उर्वरित खटल्यासाठी तिला कोर्टरूममध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले आहे.
वाद कशावरून?
अमेरिकन अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड आणि अभिनेता जॉनी क्रिस्टोफर डेप हे सुंदर जोडपे परस्पर वादांमुळे बरेच दिवस चर्चेत होते. एम्बर हर्डने माजी पती जॉन डेप विरुद्ध $100 दशलक्ष मानहानीचा दावा दाखल केला आहे. हर्ड आणि डेप यांच्यातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी सोमवारपासून सुरू झाली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या मेसेजमध्ये, अभिनेत्रीने सांगितले की, व्हर्जिनियातील फेअरफॅक्स काउंटी कोर्टहाऊसमध्ये हा खटला सुरू आहे.
अमेरिकन अभिनेत्री हर्डने जानेवारी 2021 मध्ये तिच्या पती डेपच्या वकिलाने कोर्टात केलेल्या विधानांसाठी 10 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. हा खटला कॅलिफोर्निया न्यायालयात हस्तांतरित करण्याचा त्यांचा प्रस्ताव न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही बाब पुढे आली. हर्ड आणि डेप यांच्यातील भांडण 2016 मध्ये सुरू झाले. 2016 मध्ये हर्डने डेपवर शारीरिक शोषणाचा आरोप केला होता.
हेही वाचा :
- Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय मेजवानी; कॉंग्रेस, भाजप आणि मनसेचे 'हे' बडे नेते लावणार हजेरी
- Jayeshbhai Jordaar Poster : 'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज; रणवीरने विचारलं, जयेशभाईंना मुलगा होणार की मुलगी?
- Johnny Depp, Amber Heard : पती जॉनी डेपवर 10 कोटींचा दावा ठोकला, आता अभिनेत्री एम्बर हर्ड म्हणतेय...