एक्स्प्लोर

Chandramukhi : अमृता आणि प्राजक्तामध्ये रंगणार जुगलबंदी; ‘चंद्रमुखी’मध्ये सवाल-जवाबचा तडका

अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्यामध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी प्रेक्षकांंना पाहायला मिळणार आहे.

Chandramukhi : सध्या सर्वत्र 'चंद्रमुखी' (Chandramukhi) चा बोलबाला आहे. या सौंदर्यवतीने सर्वांवर जादू केली आहे. आपल्या दिलखेचक सौंदर्याने, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता सवाल जवाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि प्राजक्ता माळीमध्ये (Prajakta Mali) रंगलेली जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे. 

यापर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. आता सवाल जवाबचा फड रंगला आहे. या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून त्याला अजय-अतुल यांचे दमदार संगीत लाभले आहे. तर मधुरा दातार, प्रियांका  बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजाने रंगत आणली आहे. दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार आता प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ‘या चित्रपटात आम्ही श्रृंगारीक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृध्द वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेल.’

‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘लावणी ही आपली लोककला आहे. ज्यांचे जतन होणे अत्यंत गरजेचे आहे. सवाल जवाबचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून लावणीप्रधान चित्रपटातून कालबाह्य झाला होता. मात्र ‘चंद्रमुखी’च्या माध्यमातून आम्ही तो पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.’

प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget