Brahmastra Teaser : ब्रम्हास्त्रचा जबरदस्त टीझर रिलीज; पाहा रणबीर, आलिया, बिग बी अन् नागार्जुन यांची झलक
Brahmastra Teaser : नुकताच या चित्रपटाचा एक खास टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये चित्रपटामधील कलाकारांची झलक दिसत आहे.
Brahmastra Teaser : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 15 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पण नुकताच या चित्रपटाचा एक खास टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये चित्रपटामधील कलाकारांची झलक दिसत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि रणबीरचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहात आहेत.त्यामुळे या चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसनं हा टीझर आज शेअर करण्याचा निर्णय घेतला. रिलीज झाल्यानंतर काही मिनीटांमध्येच या टीझरला हजारो लोकांनी पाहिलं आहे. आलिया भट सोशल मीडियावर हा टीझर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'इन जस्ट 100 डेज, ब्रह्मास्त्र पार्ट वन विल बी ऑल योर्स... ट्रेलर आउट ऑन 15 जून...'
आलिया आणि रणबी कपूर यांच्यासोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय आणि नागार्जुन हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. 9 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील केसरिया या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमधील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
View this post on Instagram
आलियाच्या वाढदिवसानिमित्त केला होता फर्स्ट लूक रिलीज
ब्रह्मास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं आलियाच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 15 मार्च रोजी एक व्हिडीओ शेअर करून या चित्रपटातील आलियाचा लूक रिलीज केला. हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅप्पी बर्थ डे आलिया. तुझ्या वाढदिवसानिमित्त ही खास गोष्ट शेअर करत आहे. ही आहे ईशा- 'ब्रह्मास्त्र' ची शक्ती' या 31 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आलियाचे 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील काही लूक दिसत आहेत.
हेही वाचा :