एक्स्प्लोर
माधुरी दीक्षित आलिया भट्टच्या आईच्या भूमिकेत?
मुंबई : लाखो हृदयांची धडकन अशी जिची ख्याती आहे, ती बॉलिवूडची धक धक क्वीन माधुरी दीक्षित आईच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. पुनरागमनानंतर सोनम कपूरच्या आईची व्यक्तिरेखेसाठी नकार देणारी माधुरी आता आलियाच्या आईचा रोल करणार का, याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात आहे.
अभिषेक वर्मनच्या 'शिद्दत' चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत. त्याचप्रमाणे माधुरीलाही या सिनेमासाठी विचारणा झाली आहे. या सिनेमाचं नाव आधी 'कलंक' होतं, नंतर ते बदलून 'शिद्दत' करण्यात आलं. त्यात आलियाच्या आईच्या भूमिकेत माधुरी दिसू शकते.
कमबॅकनंतरही तिने आजा नचले, देढ इष्किया, गुलाब गँग सारख्या चित्रपटात तिने वेगळ्या भूमिका केल्या. मात्र मुख्य हिरॉईनची आई साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ असेल. काही वर्षांपूर्वी ती 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत होती, आता ती 'सो यू थिंक यू कॅन डान्स'मध्येही जजच आहे.
आपल्या आवडत्या हिरॉईनने कायम तरुण भूमिका कराव्यात, वयापेक्षा लहान दिसावं अशी फॅन्सची अपेक्षा असते. गतकाळातील शिल्पा शेट्टी, करिश्मा कपूर, काजोल, जुही चावला यासारख्या अभिनेत्रींनी लहान मुलांच्या आईच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मात्र त्यांच्याच पिढीतील माधुरीने मात्र आईच्या रोलपासून शक्य तितकं लांब राहणंच पसंत केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement