(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virajas Kulkarni: 'अजून खूप कष्ट घ्यायचे आहेत...'; नेटकऱ्यानं विचारलेल्या प्रश्नाला विराजस कुलकर्णीनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष
विराजसनं (Virajas Kulkarni) सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
Virajas Kulkarni: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हा सध्या त्याच्या 'सुभेदार' (Subhedar) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. विराजस हा सुभेदार या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. विराजसनं सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या काही प्रश्नांची नुकतीच उत्तरं दिली आहे. विराजसनं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.
एका नेटकऱ्यानं इन्स्टाग्रामवर विराजसला प्रश्न विचारला, 'तू चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका कधी साकारणार?' नेटकऱ्याच्या या प्रश्नाला विराजसनं उत्तर दिलं, 'त्यासाठी अजून खूप कष्ट घ्यायचे आहेत. Experience कमवायचा आहे!'
'तुझा आणि शिवानीचा जुना फोटो शेअर कर प्लिज' अशी विनंती एका नेटकऱ्यानं विराजसला केली. त्यानंतर विराजसनं शिवानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये अभिनेता क्षितीज दाते देखील दिसत आहे.
विराजस (Virajas Kulkarni) हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तसेच विविध लूकमधील फोटो तो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 168K फॉलोवर्स आहेत.
गेल्या वर्षी विराजसनं अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत (Shivani Rangole) लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
'माझा होशील ना' या मालिकेमुळे विराजसला विशेष लोकप्रियता मिळाली. आता विराजस हा दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित सुभेदार या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तो जिवा ही भूमिका साकरणार आहे. सुभेदार या चित्रपटामध्ये विराजसचा अभिनय पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
‘सुभेदार’ कधी होणार रिलीज?
‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या आणि यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. 'सुभेदार' हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. तर चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या