Urfi Javed: 'असं वाटतंय मला कोणीतरी मारलंय'; उर्फीच्या पोस्टनं वेधलं साऱ्यांचं लक्ष
नुकताच उर्फीनं (Urfi Javed) तिचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या फोटोमध्ये तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे.
Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधते. नुकताच उर्फीनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
उर्फीची पोस्ट
उर्फीनं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या सेल्फीमध्ये तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे. उर्फीनं हा सेल्फी शेअर करुन कॅप्शन दिलं, 'असं वाटत आहे की, मला कोणीतरी खूप जोरात मारलं आहे.' उर्फीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. उर्फीनं तिचा हा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
उर्फीला झाली होती एलर्जी
काही दिवसांपूर्वी उर्फीनं एक पोस्ट शेअर करुन तिला झालेल्या एलर्जीची माहिती दिली होती. उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे. उर्फीनं तिच्या नो-मेकअप लूकचा फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'क्या से क्या हो गया, एलर्जीचा परिणाम. आता मी कोणासारखी दिसत आहे?'
Kya se kya ho Gaya ! When allergies hit
— Uorfi (@uorfi_) January 23, 2023
Who do I resemble right now ? pic.twitter.com/7jEJkcPi9p
काही दिवसांपूर्वी उर्फीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन तिनं केलेल्या आय फिलर्सबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'मझ्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स झाले होते. अंडर आय क्रिम हा एक स्कॅम आहे. अशी कोणतीच अंडर आय क्रिम नाहीये, जी तुमचे डार्क सर्कल्स कमी करेल. त्यासाठी आय फिलर्स हाच एक चांगला ऑप्शन आहे.' उर्फी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आरोग्याबाबत माहिती देत असते. तसेच ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते.
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तिला इंस्टाग्रामवर 3.9M मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: