Urfi Javed: सुजलेला चेहरा, डोळ्या खाली काळा डाग; फोटो शेअर करुन उर्फी जावेद म्हणाली, 'मला कोणी मारलं नाही, हे...'
उर्फी जावेदनं (Urfi Javed) नुकताच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा हा सुजलेला दिसत आहे तर तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे.
Urfi Javed: आपल्या अतरंगी स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदनं (Urfi Javed) नुकताच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा हा सुजलेला दिसत आहे तर तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे. हा फोटो शेअर करुन उर्फीनं तिच्या आय फिलर्सबाबत सांगितलं.
उर्फीनं फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'काल मी हे मेकअपनं लपवलं. मला स्वत:वर अभिमान आहे. मला कोणी मारलं नाहीये. मी आय फिलर्स केलं आहे. त्यामुळे मला थोडी जळजळ जाणवत आहे.'
उर्फीनं इन्स्टाग्रामवरएक व्हिडीओ शेअर करुन आय फिलर्सबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'मझ्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स झाले होते. अंडर आय क्रिम हा एक स्कॅम आहे. अशी कोणतीच अंडर आय क्रिम नाहीये, जी तुमचे डार्क सर्कल्स कमी करेल. त्यासाठी आय फिलर्स हाच एक चांगला ऑप्शन आहे.'
उर्फीची पोस्ट
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात. 'मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022' च्या यादीत उर्फी ही 43 व्या क्रमांकावर आहे.
View this post on Instagram
'ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर 3.9M मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: