Telly Masala : मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग ते ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Lok Sabha Election 2024 : सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2023 : बॉलिवूडनगरीत आज मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीदेखील मतदानाचा हक्क बजावत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया; 'कान्स'मध्ये जलवा दाखवल्यानंतर भारतात परतली विश्वसुंदरी
Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सध्या व्यावसायिकसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या 77 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (Cannes Film Festival 2024) सहभागी झाली होती. कान्समधील ऐश्वर्याचे दोन दिवसातील लूक समोर आले आहेत. ऐश्वर्याचे दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अभिनेत्रीचे कपडे आणि सौंदर्यापेक्षा चाहते मात्र तिच्या हाताला दुखापत झाल्याने हैरान झाले आहेत. ऐश्वर्या आता भारतात परतली आहे. एअरपोर्टवर अभिनेत्रीच्या हातावरचं प्लास्टर पाहून तिला पापराझींनी प्रश्न विचारते. आता मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यावर लवकरच शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sharad Ponkshe : पप्पा म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं, लेक म्हणाला मलापण मोदीच हवेत; पोंक्षे पितापुत्राचं थेट मत, नो गडबड!
Sharad Ponkshe : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी मुंबईत आज मतदानाचा हक्क (Lok Sabha Election 2024) बजावला आहे. शरद पोंक्षे पत्नी आणि मुलासह मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोदी (PM Narendra Modi) यावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार यावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीचं सरकार यावं, असंही ते म्हणाले. शरद पोंक्षेंनी हिंदुत्ववादी सरकार असण्याचे फायदे सांगितले. पोंक्षे पितापुत्रांनी आपलं थेट मांडलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Yami Gautam Blessed with Baby Boy : बॉलिवूडच्या सौंदर्यवतीला पुत्ररत्न; घरी पाळणा हलल्यानं चैतन्याचं वातावरण, बाळाचं नाव ठेवलंय...
Yami Gautam Blessed with Baby Boy: अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. यामी गौतमला पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. यामी आणि आदित्य यांनी ही गुड न्यूज आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. या दोघांनी आपल्या बाळाचे नावही जाहीर केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gullak Season 4 Trailer Out : अमन आता वयात आला...अन्नूवर मोठी जबाबदारी; मिश्रा परिवारात काय घडणार? 'गुल्लक 4' चा ट्रेलर लाँच
Gullak season 4 Trailer Out : मनोरंजनासोबत आपल्या भावनेला हात घालणारे मिश्रा कुटुंब आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गुल्लक' (Gullak Web Series) या वेब सीरिजचा आता चौथ्या सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या नव्या सीझनमध्ये अमन वयात येणार असून अन्नूवर मोठी जबाबदारी येणार आहे. मात्र, त्यासोबतीला आता मिश्रा कुटुंबात अनेक घडामोडी घडणार आहेत. 'गुल्लक 4' चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.