Zero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?
Zero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची नऊ डिसेंबर रोजी झालेली हत्या... ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची तीस जानेवारीला मागणी... हा सगळा घटनाक्रम नीट पाहिला तर लक्षात येतं.. की बीडच्या राजकारणात सर्वपक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंसमोरच्या अडचणी वाढवल्यात. इतकंच नाही तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणत विरोधकांनीही राज्य सरकारची कोंडी केलीय...
त्याचवेळी या प्रकरणात रोज एक नवीन धागा उलगडत जातोय.. आणि मग विरोधकांची मागणी आणखी आणखी तीव्र होत चाललीय. या परिस्थितीत धनंजय मुंडेंनी काल गाठलं ते श्रीक्षेत्र भगवानगड...
मंडळी.. भगवानगड काय आहे.. आणि त्याची महती काय आहे.. ते मी काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाहीय.. राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावर मंत्री धनंजय मुंडे पोहोचले.. त्यांनी संत भगवानबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.. मग महंत नामदेवशास्त्रींची भेट घेतली.. त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली..
त्यानंतर महंत नामदेवशास्त्रींनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला... आणि भगवानगड मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.. आणि राहणार.. हे जाहीर करुन टाकलं.. धनजंय मुंडे काही गुन्हेगार नाहीत.. हे १०० टक्के सांगू शकतो असंही नामदेवशास्त्री म्हणाले...
धनंजय मुंडे म्हणजे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही.. असं सांगून भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. भगवानगड आणि महंत नामदेवशास्त्री यांचा शब्द हा वंजारी समाजात प्रमाण मानला जातो. त्यामुळं नामदेवशास्त्रींच्या आजच्या वक्तव्यांना विशेष महत्व आहे...
भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री हे अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्यासोबत असणार आहेत.. त्यांच्याशी आपण विशेष चर्चाही करणार आहोत.. पण त्याआधी पाहूयात आज सकाळी त्यांनी केलेलं वक्तव्य... आणि त्यावर धनंजय मुंडेंनी मानलेले आभार...
All Shows

































