Telly Masala : IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
IAS Success Story : अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
IAS Keerthana Success Story : अनेक सेलिब्रिटी शिक्षण सोडून सिनेविश्वात (Bollywood) पाऊल ठेवत असतात. सिनेसृष्टीली ग्लॅमरस जग असंही म्हटलं जातं. या ग्लॅमरस जगाचं सेलिब्रिटींसह सर्वसामान्यांना कुतुहल असतं. पण एका लोकप्रिय अभिनेत्रीने मात्र आयएएस अधिकारी होण्यासाठी फिल्मी जगाला अलविदा केलं आहे. अनेक अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत येण्यासाठी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आहे. पण या सर्व अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री ते आयएएस अधिकारी झालेल्या एस कीर्तना यांचा प्रवास थक्क करणारा आहे. कोण आहेत आयएएस अधिकारी एस कीर्तना (IAS Officer HS Keerthana)...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
Bollywood 10 Superstars Struggle Story : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक कलाकारांनी स्टारकिड म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. तर दुसरीकडे काहींना मात्र स्ट्रगल चुकलेला नाही. बॉलिवूडनगरीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक कलाकार प्रचंड मेहनत घेत आहेत. मेहनतीच्या जोरावर काही यशस्वी झाले. तर काहींचा पहिलाच चित्रपट (Movie) अयस्वी झाला आणि त्यांनी रस्ता बदलला. पण काही कलाकार मात्र अपयश आल्यानंतरही निराश न होता मेहनत करतच राहिले. बॉलिवूडच्या 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. रजनीकांत (Rajinikanth) ते नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) या 10 अभिनेत्यांची स्ट्रगल स्टोरी खूपच खास आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bollywood Most Popular Actress : देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?
Bollywood Most Popular Actress : एखादा चित्रपट (Movie) यशस्वी होण्यात त्या चित्रपटातील कलाकारांचा मोठा वाटा असतो. कलाकारांची लोकप्रियता जास्त असेल तर सिनेमाच्या कमाईवर त्याचा चांगलाच परिणाम होत असतो. लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना कोणीही टक्कर देऊ शकत नाही. या बॉलिवूड अभिनेत्रींचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आजच्या काळात एखाद्या सेलिब्रिटीचं स्टारडम किती आहे हे त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या दाखवते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांची लोकप्रियता दाखवली जाते. सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि शाहरुख खानपेक्षा (Shah Rukh Khan) बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचे फॉलोअर्स सर्वाधिक आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
Bachchan Family Net Worth : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीयचं नेहमी चर्चेत असतं. आपल्या दमदार आवाजाने आणि अदाकारीने अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडनगरीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. बच्चन कुटुंबात अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सुपरस्टार्स आहेत. वर्षाला हे सर्व कोट्यवधींची कमाई करतात. पण तरीही बच्चन कुटुंबात सर्वात श्रीमंत कोण? आणि सर्वात गरीब कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. जाणून घ्या ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), जया बच्चन (Jaya Bachchan) अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या कमाईबद्दल...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mukesh Khanna : "लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Mukesh Khanna on Zeenat Aman Live in Relationship Comment : बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याकाळच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये झीनतचा समावेश होतो. रुपेरी पडद्यावर अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे होत असे. झीनत आज सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रीय आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टची चाहते प्रतीक्षा करत असतात. झीनत अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत (Live In Relationship) आपलं मत मांडलं असून त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. झीनतचं काहींनी कौतुक केलं असलं तर काही मंडळी मात्र तिला ट्रोल करताना दिसून येत आहेत. आता 'शक्तिमान' (Shaktimaan) फेम मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनीदेखील यावर आपलं मत मांडलं आहे.