CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
CNG Price Hike : महानगर गॅस कंपनीने आपल्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर कंपनीने CNG गॅसचे दर वाढवले आहेत.
पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांच्या खिशावर पुन्हा एकदा भार पडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. CNG गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीने आपल्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर कंपनीने CNG गॅसचे दर वाढवले आहेत. आजपासून नवे दर लागू होणार आहेत. (CNG Price Hike)
पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 2 रूपयांची वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. आजपासून (22 नोव्हेंबर)पासून साएनजीचे नवीन दर लागू झाले आहेत, त्यानंतर मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर 77 रुपये प्रति किलो झाला आहे. या दर वाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहन चालकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या खिशावर भार पडणार आहे. (CNG Price Hike)
सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे सीएनजीवरती चालणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटला देखील त्याचा फटका बसणार आहे. सीएजीवरती चालणाऱ्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या खर्चात देखील वाढ झाल्याने भाडे वाढण्याची देखील शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिकांसमोर आणखी एक आव्हान समोर आलं आहे. सीएनजी गॅस 2 रुपयांनी महाग झाला आहे. आधी सीएनजीचा दर 75 रुपये प्रति किलो होता. तो आता 77 रुपये प्रति किलो झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्ट वाढवल्यामुळे एमजीएलने (MGL) दरात वाढ केली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदीत वाढ आणि इतर ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने गॅसच्या दरात वाढ केल्याची माहिती आहे. एमजीएलने (MGL) याआधी जुलै 2024 मध्ये सीएनजी (CNG) ची किंमत वाढवली होती. सीएनजीच्या दरात किलोमागे 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सीएनजीची किंमत 75 रुपये किलो होती. आता 2 रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बजेट कोलमडणार असल्याची माहिती आहे.
एमजीएलने पाच महिन्यांत केलेली ही दुसरी दरवाढ आहे. एमजीएलने घेतलेल्या या निर्णयानंतर इतर गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्याही दर वाढवू शकतात. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व कंपन्या किमती बदलत आहेत. पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 2 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान संपताच दर वाढवल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.