IAS Success Story : अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
HS Keerthana IAS Officer : अनेक सुपरहिट चित्रपट आपल्या नावावर असणारी लोकप्रिय अभिनेत्री एस कीर्तना आज आयएएस अधिकारी (IAS Keerthana) म्हणून काम करत आहे.
IAS Keerthana Success Story : अनेक सेलिब्रिटी शिक्षण सोडून सिनेविश्वात (Bollywood) पाऊल ठेवत असतात. सिनेसृष्टीली ग्लॅमरस जग असंही म्हटलं जातं. या ग्लॅमरस जगाचं सेलिब्रिटींसह सर्वसामान्यांना कुतुहल असतं. पण एका लोकप्रिय अभिनेत्रीने मात्र आयएएस अधिकारी होण्यासाठी फिल्मी जगाला अलविदा केलं आहे. अनेक अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत येण्यासाठी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आहे. पण या सर्व अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री ते आयएएस अधिकारी झालेल्या एस कीर्तना यांचा प्रवास थक्क करणारा आहे. कोण आहेत आयएएस अधिकारी एस कीर्तना (IAS Officer HS Keerthana)...
कोण आहे एस कीर्तना (Who is IAS Officer HS Keerthana)
एस कीर्तना यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. कन्नड मनोरंजनसृष्टीतील एस कीर्तना या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. बालकलाकार म्हणून कीर्तना यांचा प्रवास सुरू झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षापासून 15 व्या वर्षापर्यंत आपल्या दमदार आणि सटल अभिनयाने कीर्तना यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. कीर्तना कन्नड सिनेसृष्टीतच करिअर करणार असं त्याकाळी लोकांना वाटत असे. पण दुसरीकडे अभिनेत्रीने मात्र वेगळ्याच क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. स्टारडममध्ये न अडकता अभिनेत्रीने देश सेवा करण्याचा निर्णय घेतला.
कन्नड मनोरंजनसृष्टी गाजवलेल्या कीर्तना
कीर्तना यांनी 'गंगा-यमुना','उपेंद्र','सर्कल इंस्पेक्टर','लेडी कमिश्नर','जननी','कन्नूर हेग्गादथी','ओ मल्लिगे','हब्बा'सह अनेक मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. 'डोर','सिम्हाद्री' आणि 'पुतानी एजेंट' या चित्रपटांतही ती झळकली. अभिनेत्री ते आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास कीर्तनासाठी नक्कीच सोपा नव्हता. आयएस अधिकारी झालेल्या कीर्तना पुन्हा कधी रुपेरी पडद्यावर झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. कन्नड मनोरंजनसृष्टीतील 15 पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपटांत कीर्तना महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या आहेत.
कीर्तना यांना आलंय अनेकदा अपयश
यूपीएससीची (UPSC) परीक्षा पास करत कीर्तना आयएएस अधिकारी झाल्या आहेत. कीर्तना यांनी एकूण पाचवेळा यूपीएससीची परिक्षा दिली आहे. पाचवेळा परिक्षा देताना त्यांनी कधीच हार मानली नाही. किंवा त्या निराशही झाल्या नाहीत. ध्येय, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सहाव्या प्रयत्नांत त्यांना यश आलं.
कीर्तना आज अभिनेत्री नव्हे तर आयएएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. कीर्तना यांची पहिली पोस्टिंग कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून करण्यात आली होती. UPSC परिक्षेकडे मोर्चा वळवण्याआधी कीर्तना यांनी कर्नाटक प्रशासकीय सेवा परिक्षा दिली होती. 2020 मध्ये कीर्तना यांना यूपीएससीमध्ये यश मिळालं. 167 रँकसह त्या आयएएस अधिकारी झाल्या होत्या. अनेक अडचणींवर मात करत त्या आयएएस अधिकारी झाल्या. UPSC देशातील सर्वात मोठी आणि कठीण परिक्षा उत्तीर्ण करत कीर्तना यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
संबंधित बातम्या