Taapsee Pannu : तब्बल 12 तास डोळ्यांवर पट्टी... अन् तापसीनं केलं असं काही; तुम्हीही ऐकून थक्क व्हाल!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूच्या चित्रपटांची वाट तिचे चाहते उत्सुकतेने बघत असतात. तापसीचा ब्लर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Taapsee Pannu Blur Film : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) चित्रपटांची वाट तिचे चाहते उत्सुकतेने बघत असतात. तापसीचा ब्लर (blur) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तापसीची हटके भूमिका असणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तापसीने मेहनत घेतली आहे. ब्लर चित्रपटाच्या भूमिकेचा आभ्यास करण्यासाठी तापसीने तब्बल 12 तास तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती.
एका रिपोर्टनुसार, तापसी सकाळी 7 वाजल्यापासून डोळ्यांवर कॉटनचा कपडा बांधत होती. सर्व कामे ती डोळ्यांवर पट्टी बांधून करत होती. ब्लर चित्रपटासाठी तापसीने बरीच मेहनत केली आहे. तिने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो शेअर करून तापसीने त्याला कॅप्शन दिले, 'आणि चित्रपटाचे शूटिंग संपले... पुढच्यावर्षी चित्रपटगृहात भेटूयात.' या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मीती आउटसाइडर्स फिल्म्स आणि इकोलोन प्रोडक्शन यांनी केले आहे. आउटसाइडर्स फिल्म्स हे तापसी पन्नूचे प्रोडक्शन हाऊस आहे. या चित्रपटात तापसीसोबतच अभिनेता गुलशन देवय्याने प्रमुख भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
Netflix Website : Netflix प्रेमींसाठी खुशखबर! लोकप्रिय सिनेमे आणि वेब सीरिजसाठी नवी वेबसाइट लॉन्च
तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या थप्पड, सांड की आंख, बदला, मनमर्जिया, पिंक, नाम शबाना, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Urfi Javed : "निर्लज्ज"...; उर्फीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप