एक्स्प्लोर
15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी लग्नाबाबत सुष्मिता सेन म्हणते...
सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये सुरू आहे. यावर आता सुष्मिताने मौन सोडले आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. आधी सोनम कपूर त्यानंतर नेहा धुपिया या दोघींनी नुकतीच त्यांची लग्नं उरकून घेतली. त्यानंतर आता दीपिका पादुकोण व रणवीर सिंग पुढच्या महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यामध्ये आता अभिनेत्री सुष्मिता सेनची भर पडणार असल्याचे बोलले जात आहे. सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये सुरू आहे. यावर आता सुष्मिताने मौन सोडले आहे. सोशल मीडियाचा आधार घेत तिने या सगळ्या चर्चा खोट्या ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन सध्या 42 वर्षाची आहे. तर तिचा कथित बॉयफ्रेंड रोहमन शॉल हा केवळ 27 वर्षांचा आहे. त्या दोघांच्या अफेअर आणि लग्नाची चर्चा सुरु आहे. परंतु काल सुष्मिताने इन्स्टाग्रामवर तिचा व्हर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओवर तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. की लोक जेव्हा तुमच्याबाबत चर्चा करत असतात तेव्हा मी व्हर्काऊट करत असते. सर्व गॉसिप हे बेकार आहे. आत्ता माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. मी आत्ता आयुष्याशी रोमांस करत आहे. मला जे बोलायचे होते, ते मी बोलले आहे.
बॉलीवुड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार सुष्मिता आणि रोहमन गेल्या वर्षी गाला येथील एका फॅशन शोमध्ये भेटले. त्यानंतर दोन महिने त्यांनी एकमेकांना डेट केले. त्यामुळेच आता या दोघांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. परंतु सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचे तोंड बंद केले आहे.
View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement