एक्स्प्लोर
कंगनासोबत काम करण्याची इच्छाः सुशांत

नवी दिल्लीः 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या यशानंतर आता अभिनेता सुशांत सिंह राजपूतने बॉलिवूड क्वीन कंगना रणावतसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत सुशांतने ही इच्छा व्यक्त केली.
कंगनामध्ये काम करण्याची भरपूर क्षमता आहे आणि तिची आतापर्यंतची कामगिरी आश्चर्यकारक आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करायला आवडेल, असं सुशांतचं म्हणणं आहे.
'पीके'मध्ये सोबत काम केल्यापासून अनुष्का शर्मा ही आपली आवडती आहे, असंही सुशांत म्हणाला. अनुष्काची कामातील उत्सुकता आणि उत्स्फुर्तता ही वाखणण्याजोगी असल्याचं मत सुशांतने व्यक्त केलं.
सुशांत लवकरच 'राबता' या सिनेमात अभिनेत्री क्रिती सेननसोबत दिसणार आहे. शिवाय सुशांत सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत 'ताकडुम' सिनेमाचीही शूटिंग करत आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















