![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; पाटणाहून मुंबईला येणार कुटुंबीय
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सुशांतचे कुटुंबीय त्यासाठी पाटणाहून मुंबईला येणार आहेत.
![बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; पाटणाहून मुंबईला येणार कुटुंबीय Sushant Singh Rajput suicide actors funeral today in mumbai बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; पाटणाहून मुंबईला येणार कुटुंबीय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/15144335/sushant-singh-rajput.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक पाटणावरून अंत्यसंस्कारासाठी मुंबईला येणार आहेत. याआधी अशा चर्चा होत्या की, सुशांतच्या पार्थिवावर त्याचं मूळ गाव असलेल्या पाटणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परंतु, सुशांतच्या इंडस्ट्रीमधील मित्रांनी आग्रह केल्यामुळे कुटुंबीयांनी मुंबईतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतवर विलेपार्लेच्या स्मशानभूमीत सायंकाळी 4 वाजता अत्यंतसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या 6 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता सुशांत
अद्याप सुशांतने आत्महत्या का केली? याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, पोलीस आणि त्याच्या मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, तो गेल्या 6 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि औषधंही वेळेवर घेत नव्हता. पोलिसांना तपासादरम्यान, सुशांतच्या घरातून डिप्रेशन वर उपाचर घेत असल्याची सुशांतची फाईल मिळाली आहे. तसेच सुशांत कोणत्या आर्थिक समस्यांचा सामना करत होता का?, हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्याचे बँक अकाउंट डिटेल्स मागवले आहेत.
सुशांतने आपला बॉलीवूडचा प्रवास काई पो चे या चित्रपटाद्वारे सुरू केला होता. शुद्ध देसी रोमांस, छिचोरे, राब्ता, सोन चिरैया असे चित्रपटही केले. सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता या दूरचित्रवाणी मालिकेमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला होते.
सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात मालिकांद्वारे केली होती. 'किस देश में है मेरा दिल' स्टार प्लसवरील त्याची पहिली मालिका होती. जी 2008 मध्ये प्रसारित झाली होती. त्यानंतर झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' ही मालिकेत चांगलीच गाजली. या मालिकेत अभिनयासाठी त्याने अनेक पुरस्कारही जिंकले होते.
पाहा व्हिडीओ : Sushant Singh Rajput Suicide | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट
सुशांतचा परिचय थोडक्यात
सुशांत सिंह राजपूतचा जन्म बिहारच्या पाटणामध्ये झाला. त्याचे वडील सरकारी अधिकारी आहेत. त्याचं कुटुंब 2000 च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झालं होतं. त्याचं सुरुवातीचं शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल पाटणामध्ये झालं तर नंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज माॅडल स्कूलमध्ये तो शिकला. दिल्लीच्या काॅलेज आॅफ इंजीनिअरिंगमधून त्यानं मॅकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
काय झालं होतं त्या दिवशी?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्राइम ब्रांचची टीम सुशांतच्या डिप्रेशनवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलणार आहे. सुशांतच्या घरात 2 कुक आणि 2 मित्र राहत होते. त्याच्या एका मित्राने सांगितलं की, 'सुशांत डिप्रेशनमुळे औषधं घेत होता. तसेच तो लॉकडाऊनमध्ये एक जर्नलही लिहित होता. सुशांत सकाळी 10 वाजता आपल्या रूममधून बाहेर आला होता. त्यानंतर तो ज्युसचा ग्लास घेऊन पुन्हा खोलीत गेला. सुशांतच्या मित्राने सांगितलं की, सकाळी तो ठिक होता, पण खोलीत गेल्यावर तो बाहेर आला नाही. जेव्हा सुशांतने दरवाजा उघडला नाही, त्यावेळी त्याच्या मित्रांनी तो तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुशांतच्या मॅनेजरने चावी वाल्याला बोलावलं. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. आतमध्ये सुशांतने गळफास घेतलेला मृतदेह समोर लटकत होता.
महत्त्वाच्या बातम्या :
Sushant Singh Rajput | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)