नैराश्यात होता सुशांतसिंह राजपूत, प्राथमिक माहितीत उघड
सुशांतने आपला बॉलीवूडचा प्रवास काई पो चे या चित्रपटाद्वारे सुरू केला होता. शुद्ध देसी रोमांस, छिचोरे, राब्ता या चित्रपटात काम केले होते.
मुंबई : बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केली. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दिली आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये होता त्याच्यावर उपचार सुरू होते. सुशांतच्या घरी पोलिसांना काही औषधे मिळाली आहे त्यावरुन हा अंदाज लावण्यात आलेला आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुशांतच्या घरात सुसाइड नोट सापडलेली नाही.
मात्र, सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या घरी पोलिस उपस्थित आहेत. सुशांतने आपला बॉलीवूडचा प्रवास काई पो चे या चित्रपटाद्वारे सुरू केला होता. शुद्ध देसी रोमांस, छिचोरे, राब्ता, सोन चिरैया असे चित्रपटही केले. सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता या दूरचित्रवाणी मालिकेमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला होते.
सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात मालिकांद्वारे केली होती. 'किस देश में है मेरा दिल' स्टार प्लसवरील त्याची पहिली मालिका होती. जी 2008 मध्ये प्रसारित झाली होती. त्यानंतर झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' ही मालिकेत चांगलीच गाजली. या मालिकेत अभिनयासाठी त्याने अनेक पुरस्कारही जिंकले होते.
सुशांतचा परिचय थोडक्यात सुशांत सिंह राजपूतचा जन्म बिहारच्या पाटणामध्ये झाला. त्याचे वडील सरकारी अधिकारी आहेत. त्याचं कुटुंब 2000 च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झालं होतं. त्याचं सुरुवातीचं शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल पाटणामध्ये झालं तर नंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज माॅडल स्कूलमध्ये तो शिकला. दिल्लीच्या काॅलेज आॅफ इंजीनिअरिंगमधून त्यानं मॅकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
संबंधित बातम्या :