एक्स्प्लोर
बायोपिकसाठी सनी लिऑनची विद्या बालनला पसंती
मुंबई : बॉलिवूडची बेबीडॉल सनी लिऑन हिच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवला जाणार असल्याची चर्चा सिनेसृष्टीत होती. मात्र, सनी लिऑनने याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. मात्र, समजा असा सिनेमा निघालाच, तर त्यात मुख्य भूमिकेत म्हणजे सनी लिऑनच्या भूमिकेत कोण असेल? थांबा... तुमच्या डोक्याला ताण देण्याची गरज नाही. कारण स्वत: सनी लिऑननेच याबाबत सांगितले आहे.
"तुझ्यावरील बायोपिकमध्ये तुझी भूमिका करण्यास कोणत्या अभिनेत्रीला पसंती देशील?", या प्रश्नाला उत्तर देताना सनी लिऑनने बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन हिला पसंती दिली. विद्या बालन आपली भूमिका अत्यंत चोख निभावू शकेल, असाही सनी लिऑनला विश्वास आहे.
अभिनेत्री विद्या बालन एक अभ्यासपूर्ण आणि अभिनयात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी अभिनेत्री म्हणून हिंदी सिनेसृष्टीत परिचित आहे. विद्याने याआधी 'डर्टी पिक्चर' या बायोपिकमध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे सिनेसृष्टीसह सर्वच स्तरातून तिचे भरभरुन कौतुक झाले.
दरम्यान, सनी लिऑनच्या बायोपिकमध्ये स्वत: सनी लिऑन काम करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, सनीने विद्या बालनला पसंती देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, सनी लिऑनवरील बायोपिकची कल्पना नक्की कधी प्रत्यक्षात येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement