(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suniel Shetty : "अंडरवर्ल्डमधूल सुनील शेट्टीला यायचे धमक्यांचे फोन"; अण्णा म्हणाला,"मी माझ्या स्टाईलमध्ये त्यांचीच बोलती बंद करायचो"
Suniel Shetty : अंडरवर्ल्डमधूल फोन यायचे, याचा खुलासा सुनील शेट्टीने स्वत: केला आहे.
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) आजवर एका पेक्षा एक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बॉलिवूडसह तामिळ, तेलुगू, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतदेखील त्याने काम केलं आहे. नुकत्याच एक पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने खुलासा केला की,"90 च्या दशकात मला अंडरवर्ल्डमधूल फोन येत असे".
'द बार्बरशॉप' या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला,"त्याकाळी मुंबईत अंडरवर्ल्ड धुमाकूळ घालत होते. त्यावेळी आम्ही तुझं असं करू तसं करू अशा धमक्या देणारे कॉल मला येत असे. पण उलट मी त्यांनाच शिव्या द्यायचो. दुसरीकडे माझ्यासोबत असणारे पोलीस मात्र मला ओरडत असे. ते मला म्हणायचे,"तू वेडा आहेस का? त्यांना जर तुझा राग आला तर ते तुझा जीवदेखील घेतील". तेव्हा मी त्यांना म्हणायचो,"मी काहीही चुकीचं केलेलं नाही. तर मी घाबरणार नाही. उलट तुम्ही माझं संरक्षण करायला हवं. अशाप्रकारे मी माझ्या स्टाइलमध्ये त्यांचीच बोलती बंद करत असे".
माझ्या कुटुंबियांना याबद्दल माहिती नाही : सुनील शेट्टी
सुनील शेट्टी पुढे म्हणाला,"माझ्या कुटुंबियांना मला अंडरवर्ल्डमधूल कॉल यायचे हे माहिती नाही. मी माझ्या आयुष्यात काय काय केलं आहे त्याबद्दल अथिया आणि अहानला सांगितलेलं नाही. आजवर मी अनेक अतरंगी गोष्टी केल्या आहेत. प्रकृती खालावल्यानंतर कोणालाही न सांगता स्वत:च उपचार घेत ठिक झालो आहे. मला वाटतं वेळ हे एक चांगलं औषध असून ती सर्वकाही ठिक करत असते".
सुनील शेट्टीचे आगामी प्रोजेक्ट जाणून घ्या... (Suniel Shetty Upcoming Project)
सुनील शेट्टीचा 'मुंबई सागा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 'हेरा फेरा 3' या सिनेमाच्या माध्यमातून सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आता तो सिनेमांसह वेबसीरिजमध्येही झळकणार आहे. त्याची 'धारावी बॅंक' आणि 'हंटर' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सुनीलच्या 'हंटर'चं प्रेक्षकांकडून कौतुक
सुनील शेट्टीची 'हंटर' (Hunter) ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजचं आता प्रेक्षकांकडूनही कौतुक होत आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार, नाट्य आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला आहे. प्रीन्स धीमान आणि आलोक बत्राने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंधित बातम्या