एक्स्प्लोर

KL Rahul : आज केएल राहुलच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया, सासरा सुनील शेट्टी म्हणाला...

KL Rahul Surgery : दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर गेलेल्या केएल राहुलवर आज, 9 मे रोजी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएल सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता.

KL Rahul Health Update : सध्या सर्वत्र आयपीएल (IPL 2023) फीवर पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (Indian Premier League) अनेक खेळाडूंमागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यातीलच एक म्हणजे भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल (IPL) फ्रेंचायझी लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul). दुखापतीमुळे आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर गेलेल्या केएल राहुलवर आज, 9 मे रोजी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएल सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. त्याची दुखापत गंभीर असल्याने तो आयपीएलचे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. शिवाय तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही (WTC Final 2023) मुकणार आहे. आज त्याच्या मांडीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

आज केएल राहुलच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाचा खेळाडू केएल राहुल (KL Rahul Injured) जखमी झाला होता. त्यामुळे तो आयपीएलच्या (IPL 2023) उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. याशिवाय, राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship 2023)  च्या अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही. आज त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

सासरा सुनील शेट्टीची म्हणाला...

दरम्यान, राहुलच्या दुखापतीमुळे त्याची पत्नी अथिया शेट्टी आणि सासरे म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टीही चिंतेत आहेत आणि त्यांनी अलीकडेच त्याच्या प्रकृतीशी संबंधित माहिती शेअर केली आहे. सुनील शेट्टीनं म्हटलं आहे की, ''राहुलवर 9 मे रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे. भारतीय क्रिकेट संघात अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि सगळेच सक्षम आहेत. माझ्या मते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील दुसऱ्या खेळाडूंसाठी ही संधी आहे. याशिवाय कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो.''

टीम इंडियाला मोठा धक्का

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलला सुरुवात होणार आहे.  लंडनमधील ओव्हल मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकसमोर उभे असतील. ऑस्ट्रेलिया आणि भारताने आपल्या टीमची घोषणा केली आहे. काही खेळाडू इंग्लंडमध्ये सराव करत आहेत. तर काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

टीम इंडियाला दुखापतीचा फटका,  कोण WTC फायनलमधून बाहेर तर काहींच्या खेळण्यावर सस्पेन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget