एक्स्प्लोर
सुबोध भावेचं दक्षिणायन, मल्ल्याळम चित्रपटात पदार्पण
मुंबई : 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली' सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता सुबोध भावे दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करत आहे. सुबोध भावे आता एका मल्याळम सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक अदुर गोपालकृष्णन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. पिन्नेयम अर्थात 'वन्स अगेन' असं या सिनेमाचं शीर्षक आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक अदुर गोपालकृष्णन सिनेकारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहेत.
या सिनेमात सुबोध भावे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. दिलीप, काव्या माधवन असे दक्षिणेतले स्टार कलाकार या सिनेमात आहेत.
https://twitter.com/subodhbhave/status/765954386581389312
गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'कट्यार...' चित्रपटातून सुबोधने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यावर्षी बंध नायलॉनचे हा चित्रपट आणि का रे दुरावा, ढोलकीच्या तालावर सारख्या मालिकातून तो टीव्हीवरही झळकला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement