800 Poster: '800' चा फर्स्ट लूक रिलीज; 'हा' अभिनेता मुथय्या मुरलीधरनच्या भूमिकेत
800 या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) आयुष्यावर आधारित असणार आहे.
800 Poster: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) हा एक स्पिनर म्हणून जगभरात ओळखला जातो. मुथय्याने आपल्या करिअरमध्ये एकूण 16 विश्वविक्रम केले आहेत. 2002 मध्ये, मुरलीधरनला विस्डेनच्या क्रिकेटर्स अल्मानॅकने जगातील सर्वोत्तम कसोटी सामना गोलंदाज म्हणून घोषित केले. 2017 मध्ये, मुरलीधरन हा ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारा पहिला श्रीलंकेचा गोलंदाज ठरला. मुरलीधरनचा आज (17 एप्रिल) वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त 800 या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
'मुरली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुथय्या मुरलीधरनचा आज 51 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे नाव '800' असे आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एम.एस. श्रीपती हे करणार आहेत. अभिनेता मधुर मित्तल या चित्रपटात मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे, ज्याने 'स्लमडॉग मिलेनियर' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात सलीम ही भूमिका साकारली होती. तमिळमध्ये भाषेत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही देशभरात प्रदर्शित होणार आहे. क्रिकेटपटू मुरलीधरन हा यशस्वी गोलंदाज कसा बनला, हे या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दाखवले जाईल.
पाहा पोस्टर
View this post on Instagram
'स्लमडॉग मिलेनियर' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात सलीमची भूमिका साकारून दमदार अभिनेता म्हणून स्वत:चा ठसा उमटवणारा मधुर मित्तल '800' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप उत्सुक आहे. तो म्हणतो, “मुरलीधरन ही दिग्गजाची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणे, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. जरी आपण सर्वजण त्याला एक महान क्रिकेटर म्हणून ओळखत असलो, पण त्याचे जीवन आणि संघर्षांवर मात करण्याचा प्रवास इतका रंजक आहे की, ते पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील' 800 या चित्रपटाचा ट्रेलर आणि या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: