SRH vs GT : अखेरच्या षटकात राशिद-राहुलची फटकेबाजी, मार्कोची खराब गोलंदाजी अन् मुरलीधरनचा राग अनावर, पाहा VIDEO
IPL 2022 : गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्यात राहुल तेवातिया आणि राशिद खान यांच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचा 5 विकेट्सने पराभव झाला.
Muttiah Muralitharan : आयपीएलमध्ये (IPL 2022) बुधवारी रात्री झालेल्या रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबादवर पाच विकेट्सनी विजय मिळवला. यावेळी हैदराबादचा कोच आणि माजी क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन (muttiah muralitharan) याचं एक रौद्ररुप पाहायला मिळालं. हैदराबादच्या मार्को यॅन्सनच्या अखेरच्या षटकात राशिद आणि तेवतिया यांनी ठोकलेल्या षटकारानंतर कायम शांत स्वरुपात दिसणारा मुथय्या रागात दिसून आला. तो पवेलियनमध्ये उभा राहून रागात असल्याचं दिसून आला.
सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या 196 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या संघाला अखेरच्या षटकात तब्बल 22 धावांची गरज होती. यावेळी हैदराबादने मार्को यॅन्सनला गोलंदाजी दिली होती. यावेळी तेवतियाने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर राशिदने एक षटकार खेचला. राशिदने पुन्हा पाचव्या चेंडूवर षटकार खेचला. याचवेळी मार्कोने फुलटॉस टाकल्यामुळे मुथय्या चांगलाच भडकलेला दिसून आला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुजरातचा 5 विकेट्सनी विजय
हैदराबादने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात सन्माजनक झाली. गिल आणि साहा यांनी 69 धावांची सलामी दिली. उमरान मलिक याने भेदक मारा करत गुजरातच्या अडचणी वाढवल्या. उमरान मलिकने चार षटकात पाच विकेट घेतल्या. उमरान मलिकशिवाय एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. गुजरातकडून साहाने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. त्याशिवाय राहुल तेवातियाने 40 तर राशिद खान याने 31 धावांची नाबाद खेळी करत गुजरातला विजय मिळवून दिला. गिल 22, हार्दिक पांड्या 10, डेविड मिलर 17 आणि अभिनव मनोहर 0 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
हे देखील वाचा-