Sonu Sood: वडिलांच्या पावलावर पाऊल, गरजू लोकांच्या मदतीला धावला सोनू सूदचा मुलगा; व्हिडीओ व्हायरल
सोनू सूदचा (Sonu Sood) मुलगा ईशानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो लोकांची मदत करताना दिसत आहे.
Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेक गरजू लोकांची सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता. त्यानं शहरांत अडकलेल्या कामगारांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था करुन दिली. तसेच, अनेकांना आर्थिक मदत देखील सोनूनं केली. महामारीच्या कठीण काळात सोनूनं सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्याच्यावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता सोनू सूदच्या पावलावर पाऊल टाकून त्याचा मुलगा देखील गरजू लोकांची मदत करत आहे.
फतेही या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सोनू हा अमृतसर येथे गेला आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. अनेक गरजू लोक सोनू सूदच्या मुंबई येथील घराजवळ मदत मागण्यासाठी येत असतात. सध्या सोनू हा अमृतसरला गेल्यानं त्याचा मुलगा ईशान हा गरजूंच्या मदतीसाठी धावला आहे.
सोनू सूदचा मुलगा ईशानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो घराखाली उभ्या असलेल्या लोकांना मदत करताना दिसत आहे. ईशान त्या लोकांनी आणलेले कागदपत्र देखील बघताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
ईशान सूदच्या या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांची ईशानचं कौतुक केलं आहे. एका युझरनं कमेंट केली, 'आम्हाला तुझा अभिमान वाटतो' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सोनू सूदच्या फतेह या चित्रपटाला आम्ही सपोर्ट करु, ज्यामुळे सोनू सूद हा सगळ्या गरजू लोकांची मदत करु शकेल. '
सोनू हा फतेह या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद ए आजम’ या हिंदी चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे. चित्रपटांबरोबरच सोनू हा त्याच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. जोधा अकबर, सिंह इज किंग, एक विवाह ऐसा भी,मिशन मुंबई या चित्रपटांमध्ये सोनूनं महत्वाची भूमिका साकारली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sonu Sood: कोरोना काळात केलेल्या मदतीसाठी पैसे कुठून आणले? सोनू सूदनं स्पष्टच सांगितलं