एक्स्प्लोर

Sonu Sood: कोरोना काळात केलेल्या मदतीसाठी पैसे कुठून आणले? सोनू सूदनं स्पष्टच सांगितलं

Sonu Sood Revelaed: सोनू सूदने कोविडच्या काळात गरजूंना सढळ हाताने मदत केली. सोनू करत असलेल्या मदतीवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होत. अखेर सोनूनं यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 

Sonu Sood Revelaed: अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता. त्यानं कामामुळे इतर शहरांत अडकलेल्या कामगारांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था करुन दिली. तसेच, अनेकांना आर्थिक मदतही केली. महामारीच्या कठीण काळात सोनूनं सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्याच्यावर एकिकडे कौतुकाचा वर्षाव होत होता. पण दुसरीकडे सोनूनं मदतसाठी करत असलेल्या खर्चावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच, त्याच्यावर काही गंभीर आरोपही झाले. यावर आता सोनूनं आपलं मौन सोडलं आहे. काही दिवसांपूर्वी आप की अदालत कार्यक्रमात बोलत असताना सोनूनं या मदतीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 

आप की अदालत या कार्यक्रमात सोनूला मदतीची प्रेरणा आणि त्यासाठी जमा केलेले पैसे कुठून आले? यासंदर्भात विचारणा केली. याबाबत बोलताना सोनूनं सांगितंल की, "जेव्हा मी मदत करायला सुरुवात केली, तेव्हा मला याची कल्पना होती की, मला गरजूंना  मदत करायची आहे आणि पैसे हीच यातली महत्त्वाचा गोष्ट आहे. लोकांकडून अशा विनवण्या केल्या जात होत्या की, मला जाणवलं की, माझा दोन दिवसही निभाव लागणार नाही. माझ्याकडे जेवढे ब्रॅंड होते, त्या सगळ्यांना मी डोनेशन जमा करण्यास सांगितलं. या कामात मी डॉक्टर, विद्यार्थी, औषध बनवणाऱ्या कंपन्या, शिक्षक सगळ्यांना बरोबर घेतलं. असा जवळपास एकही ब्रॅंड नाहीये ज्यांना मी या कामात सोबत घेतलं नसेल. प्रत्येक ब्रॅंडला मी असं सांगितलं की, तुम्ही माझ्यासोबत या समाजकार्यात सहभागी व्हा, मी तुमच्या जाहीरातींमध्ये काम करण्यासाठी कोणतंही मानधन घेणार नाही."

सोनू सूदनं पुढे बोलताना सांगितलं की, "मला अनेक मोठ्या NGOs मधून फोन आले. ते म्हणाले की, देशाच्या 130 कोटींच्या लोकसंख्येसमोर माझा निभाव लागणार नाही. त्यावर मी त्यांना सांगितलं की, जे लोक मदतीच्या आशेनं माझ्या घराखाली येतात, त्यांना मी नाही म्हणू शकत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कोणत्याही शहरात, जिल्ह्यात, एखाद्या गावातसुद्धा तुम्ही सांगितलं तर मी कोणालाही शिक्षणासाठी मदत करू शकतो, शिकवू शकतो, एखाद्या गरजू व्यक्तीच्या उपचारासाठी मदत करू शकतो, एखाद्याला नोकरी देऊ शकतो. तुम्ही फोन केलात, तर मी नक्कीच मदत करू शकतो."

सोनूनं हेदेखील स्पष्ट केलं की, त्याचं सोशल मीडिया सांभाळायला कोणतीही टीम त्यानं ठेवली नव्हती. तो स्वतःहून प्रत्येक ट्वीटला उत्तर द्यायचा. सोनूनं कोविड काळात त्याच्या घरी आलेल्या प्रत्येकाला, तसेच सोशल मीडियावर मदत मागणाऱ्या प्रत्येकाला मदतीचा हात पुढे केला होता. 

दरम्यान, सोनू सूदच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी तो पृथ्वीराज सिनेमात दिसून आला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. सध्या सोनू त्याच्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. सोनू लवकरच आगामी चित्रपट फतेहमध्ये दिसून येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget