गायक नितीन बाली यांचा अपघाती मृत्यू
मुंबई : प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचा मुंबईत अपघाती मृत्यू झाला आहे. नितीन बाली 47 वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी मालाड येथे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.
घरी आल्यानंतर काही वेळाने नितीन त्यांना पोट दुखीचा त्रास होऊ लागला. रक्ताच्या उलट्याही झाला, त्यांचा ब्लड प्रेशरदेखील वाढला. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नितीन बाली मंगळवारी बोरीवलीहून मालाडला जात असताना त्यांची गाडी दुभाजकाला धडकली. या अपघातात ते जखमी झाले होते. नितीन बाली दारुच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नितीन बाली 90च्या दशकातील प्रसिद्ध गायक होते. रिमिक्स गाण्यांसाठी ते ओळखले जात होते. नीले नीले अंबर पे, छुकर मेने मन को, एक अजनबी हसिना से, पल पल दिल के पास यांसारखी अनेक गाण्यांना त्यांनी रिमिक्स केलं होतं.